शासकीय रेखाकला परीक्षेत विधाते विद्यालयाचे यश

शंभर टक्के निकाल; गौरी थोरात व करण रोडे अ श्रेणीत उत्तीर्ण

नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा) सारसनगर येथील कै. दामोदर विधाते (मास्तर) माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून, एलिमेंटरी मध्ये गौरी यशवंत थोरात व करण हनुमंत रोडे अ श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
एलिमेंटरी परीक्षेत दहा तर इंटरमिजिएट परीक्षेसाठी 30 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एलिमेंटरी परीक्षेत अ व ब श्रेणीत प्रत्येकी 2 विद्यार्थी तर क श्रेणीत 6 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इंटरमिजिएट परीक्षेत 7 विद्यार्थी ब श्रेणीत तर 23 विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
या गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा संस्थेचे विश्‍वस्त बाळासाहेब (अण्णा) विधाते, रामदास कानडे, संस्थेचे सरचिटणीस प्रा. शिवाजी विधाते, विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष सुसे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के यांनी अभिनंदन केले.