संभाजी लांगोरे – बदलासाठी झपाटलेला अधिकारी! | #YoungIconsOfIndia 

काही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने फक्त यश कमावत नाहीत, तर समाजासाठी एक नवा आदर्श उभा करतात. असाच एक ऊर्जावान, संवेदनशील आणि ध्येयवेडा अधिकारी म्हणजे संभाजी लांगोरे, सध्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत!

🔥
 संभाजी लांगोरे – बदलासाठी झपाटलेला अधिकारी! | #YoungIconsOfIndia 🇮🇳

📍 अहिल्यानगर | मेट्रो पोर्टल एक्सक्लुझिव्ह

काही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने फक्त यश कमावत नाहीत, तर समाजासाठी एक नवा आदर्श उभा करतात. असाच एक ऊर्जावान, संवेदनशील आणि ध्येयवेडा अधिकारी म्हणजे संभाजी लांगोरे, सध्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत!

👨‍🎓 टॉपर म्हणून प्रशासकीय सेवेत आलेले, पण मनात होती ग्रामीण भागातील जनतेसाठी काम करण्याची तीव्र तळमळ! आई-वडिलांनी दिलेल्या सशक्त संस्कारांनी आणि शेतकऱ्यांच्या व्यथांनी त्यांचं अंतर्मन हलवलं… आणि सुरू झाला प्रशासकीय सेवेचा स्व-अभ्यास प्रवास! पहिल्याच प्रयत्नात अपयश आलं, पण त्यांनी हार मानली नाही. दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी मिळवलं IRS सेवा, आणि त्या यशाला मिळालं आई-वडिलांचा आशीर्वाद, समाजाची दाद आणि स्वतःच्या मेहनतीचं फळ!

🎯 लांगोरे यांचं जीवन म्हणजे कर्तृत्व, संवेदनशीलता आणि जबाबदारीचं सुंदर कॉम्बो! प्रशासकीय सेवेत येऊन त्यांनी बदलाचं बाणं घेतलं – जिल्हा परिषदेमध्ये छोटे-मोठे पण प्रभावी बदल करत सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून काम केलं.

👨‍👩‍👧‍👦 वैयक्तिक जीवनातही ते तितकेच यशस्वी! बापुसाहेब नागवडे यांच्याकडे पाहुणे म्हणून गेले आणि विवाहबद्ध झाले. आर्यतेज आणि दिव्या ही दोन अपत्यं – आणि त्यांचं संगोपन ते दोघंही जबाबदारीने आणि प्रेमाने करत आहेत.

💡 संभाजी लांगोरे म्हणजे ‘पदावर’ बसलेला अधिकारी नाही, ‘मनावर’ चालणारा नेता आहे!
त्यांच्या कामातून, विचारातून आणि जीवनातून मिळणारा एकच मंत्र –
👉 “बदलासाठी पद नव्हे, तळमळ हवी!”

📣 अशा कर्तबगार नेतृत्वासाठी सलाम करा आणि प्रेरणा घ्या.