“Shabari Mahamandal Scam”
आदिवासी निधीचा गैरवापर, आयुक्त लीना बनसोड यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी!"
“शबरी महामंडळ घोटाळा : आदिवासी निधीचा गैरवापर, आयुक्त लीना बनसोड यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी!”
नगर (प्रतिनिधी): आदिवासी समाजाच्या नावावर आलेला निधी इतर समाजाच्या विकासासाठी वळवण्यात आला आहे, असा गंभीर आरोप करत आदिवासी फासे पारधी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले यांनी राष्ट्रपतींना थेट निवेदन दिलं आहे.
या निवेदनात शबरी महामंडळाच्या एफ.पी.ओ. (FPO) प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचा उल्लेख असून, व्यवस्थापकीय संचालक व आदिवासी आयुक्त लीना बनसोड आणि प्रशांत ब्राह्मणकर यांनी आदिवासींच्या हक्काचा निधी चुकीच्या पद्धतीने वापरल्याचा आरोप आहे. त्यामुळे दोघांची तात्काळ बदली आणि न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुख्य मुद्दे:
-
आदिवासी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
-
लीना बनसोड यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी
-
बिगर आदिवासी संचालकांची अट रद्द करून फक्त आदिवासी संचालक असलेल्या संस्थांना योजनांचा लाभ द्यावा
-
घोटाळ्यावर लीना बनसोड यांचा तपासात हस्तक्षेप होण्याची शक्यता
-
“इच्छा मरण” ची धमकी देत आंदोलनाची तयारी
भोसले यांनी म्हटलं की, “आदिवासी समाज अजूनही मूलभूत गरजांसाठी झगडतोय आणि अशावेळी निधीचा अशा प्रकारे अपहार होणं हे अत्यंत लज्जास्पद आहे. या प्रकरणात गांभीर्याने दखल न घेतल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू.”
👉 तुमच्या मतानुसार हा आरोप किती गंभीर आहे? खाली कमेंट करून सांगा!
📲 बातमी शेअर करा, आवाज बुलंद करा! #आदिवासीहक्क #FPOScam #JusticeForAdivasis