शालिनीताई विखेंचा क्रीडा मंत्र – “अभ्यासासोबत खेळातही चमका!”
फक्त अभ्यासच नाही, खेळालाही प्राधान्य द्या! खेळातून जिद्दीने करिअर घडवा आणि जीवनाचा सामना ‘प्लेअर स्पिरिट’ ने करा!"


नगर : 
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना खास संदेश दिला –
“फक्त अभ्यासच नाही, खेळालाही प्राधान्य द्या! खेळातून जिद्दीने करिअर घडवा आणि जीवनाचा सामना ‘प्लेअर स्पिरिट’ ने करा!” 

लोणी येथे १७ वर्षाखालील मुलींचा राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप २०२५
चा शानदार शुभारंभ झाला. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी आणि प्रवरा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. 
क्रीडांगणावर मुलींचा दमदार जलवा!
या स्पर्धेत ९ संघ – नागपूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि क्रीडा प्रबोधिनी – येथील तब्बल १४४ खेळाडू सहभागी झाले आहेत. 
उद्घाटन सामन्यात अमरावतीने नाशिकचा ४–० असा धुव्वा उडवला! 
आज उप-उपांत्य फेरीचे सामने रंगणार असून, गुरुवारी उपांत्य फेरी आणि फायनल होणार आहे. 
सुविधा + संधी = क्रीडाक्षेत्रात यश
कार्यक्रमात उपस्थित डॉ. सुस्मिता विखे पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, तालुका क्रीडा अधिकारी प्रवीण कोढवळे, कॅम्प संचालक डॉ. आर. ए. पवार यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
ज्ञानेश्वर खुरंगे यांनी सांगितले की, राज्य शासनाकडून
सुसज्ज क्रीडांगणे, इनडोअर स्टेडियम आणि विविध योजना राबवून खेळाडूंना योग्य सुविधा मिळत आहेत. प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमीमुळे
अनेक खेळांना बळ मिळालं आहे.
शालिनीताईंचा पॉवरफुल मेसेज
“खेळातून जिद्द, शिस्त आणि टीमवर्क शिकायला मिळतं. हेच जीवनात यशाचं खरं सूत्र आहे!” 
मेट्रो कमेंट बॉक्स प्रश्न
तुमच्या मते – शाळा-काॅलेजमध्ये क्रीडा स्पर्धा किती महत्वाच्या आहेत? 

#SportsNews #GirlsFootball #PravaraSports #ShalinitaiVikhe #MaharashtraSports #MetroPortal #FootballFever #Motivation #CareerInSports