नवीन ठिकाणी स्थायिक झाला आहात? आता आधार कार्डवरचा पत्ता बदला घरबसल्या!
आधार कार्ड हे आज प्रत्येक भारतीयाचं सर्वात महत्त्वाचं ओळखपत्र बनलं आहे.
Share
नवीन ठिकाणी स्थायिक झाला आहात? आता आधार कार्डवरचा पत्ता बदला घरबसल्या!
आधार कार्ड हे आज प्रत्येक भारतीयाचं सर्वात महत्त्वाचं ओळखपत्र बनलं आहे. शाळा–कॉलेजमधील ऍडमिशन असो , बँक अकाऊंट उघडणे , केवायसी प्रक्रिया , सरकारी योजनांचा लाभ घेणे किंवा अगदी सिमकार्ड खरेदी करणे – आधार शिवाय काहीच शक्य नाही!
म्हणूनच तुमचं आधार कार्ड नेहमी अपडेटेड असणं गरजेचं आहे. पण पत्ता बदलल्यावर आधार अपडेट करणं म्हणजे मोठं डोकं दुखीचं काम होतं . आधार सेंटरवर मोठी गर्दी, वेळेची नासाडी आणि पूर्ण दिवस खर्च करूनही काम अपुरं राहणं… हे वास्तव सगळ्यांनी अनुभवलेलं आहे.
यूआयडीएआयची नवी सुविधा – घरबसल्या अपडेट!
आता मात्र तुमचं हे टेन्शन संपलं आहे . UIDAI ने आधार कार्डवरील पत्ता बदलण्याची सोय थेट ऑनलाईन सुरू केली आहे. त्यामुळे आता आधार सेंटरला धावपळ नाही , रांगेत उभं राहण्याची गरज नाही – फक्त दोन मिनिटांत तुमचा पत्ता घरबसल्या अपडेट!
पत्ता बदलण्याची सोपी प्रोसेस
स्टेप 1: सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या स्टेप 2: My Aadhar या विभागात जाऊन Update Your Aadhaar वर क्लिक करा स्टेप 3: Update Aadhaar Online हा पर्याय निवडा स्टेप 4: तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि OTP रजिस्टर मोबाईल नंबरवर घ्या स्टेप 5: लॉगिन करून Address Update हा पर्याय निवडा आणि नवीन पत्ता भरा स्टेप 6: पत्त्याचा पुरावा अपलोड करा – विज बिल , भाडे करार , बँक स्टेटमेंट इ. स्टेप 7: अर्ज सबमिट करा
एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर UIDAI त्याची पडताळणी करते. साधारण ७–१४ दिवसांत तुमच्या आधारवरचा पत्ता बदलला जातो .
का आहे महत्त्वाचं?
जर पत्ता अपडेट नसेल तर बँक व्यवहार, सरकारी योजना, शैक्षणिक प्रक्रिया किंवा कुठल्याही अधिकृत कामात अडथळे येतात . त्यामुळे आधार अपडेटेड ठेवणं म्हणजे स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला त्रासापासून वाचवणं.
मेट्रो न्यूज स्पेशल टिप
बदल करण्याआधी खात्री करा की मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे पत्ता पुराव्याचा कागदपत्र स्पष्ट (स्कॅन/फोटो) अपलोड करा अर्ज केल्यानंतर मिळालेला URN नंबर नोंदवून ठेवा
आता आधार अपडेट करणं म्हणजे फक्त काही क्लिक्सचं काम आहे !
तुम्ही नवीन ठिकाणी राहत असाल तर आजच पत्ता अपडेट करा आणि भविष्यातल्या अडचणींना दूर ठेवा .