शिर्डीचा महेश तांबे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरस्टार!
फिनलंड संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि शिर्डीचा सुपुत्र महेश तांबे याने इतिहास रचला!

फिनलंड संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि शिर्डीचा सुपुत्र महेश तांबे याने इतिहास रचला!
८ चेंडूत ५ बळी! – टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान पंचक घेत नवीन विक्रम प्रस्थापित केला.
एस्टोनियाविरुद्ध सामन्यात, अवघ्या ४ धावांवर २ विकेट्सवर असलेल्या संघाला तांबेंनी १४१ वर सर्वबाद केलं.
आता रशीद खानचा विक्रम मागे टाकण्याच्या तयारीत!
२४ टी-२० सामने, २० विकेट्स आणि १४० धावा – असं दमदार परफॉर्मन्स रेकॉर्ड!
इंग्लंडमधून राष्ट्रीय स्तरावर खेळतोय, पण मुळचा राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुकचा रहिवासी!
निमगाव कोऱ्हाळेच्या ग्रामपंचायत सदस्य मोहिनी कातोरे यांचा भाऊ आणि राहुल कातोरे यांचा मेहुणा – गावासाठी अभिमानाची बाब!
आता महेश तांबे हे नाव क्रिकेटविश्वात गाजणार, तयार राहा भारतातील नवा हिरो पाहण्यासाठी!