अहमदनगर : गेल्या दोन ते तीन वर्षांपासून खा. कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर चे मुख्य प्रवेशद्वार एका बाजूने बंद केलेलं होते. हे द्वार बंद असल्याने व्यापारी आणि शेतकरीवर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी शेतकरी आणि व्यापारी वर्ग वारंवार हे द्वार उघडण्याची मागणी करत होते. शेतकऱ्यांना यात यश न आल्याने त्यांनी शिवसेनेकडे धाव घेतली. शिवसेनेच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे द्वार उघडण्याचे आंदोलन करण्यात आले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगून रस्ते सुरक्षा समितीचे जिल्हयाचे खासदार लोखंडे यांच्याशी चर्चा केली,परंतु संबंधित अधिकऱ्यांनी खासदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली, या कारणास्तव शिवसेनेच्या पदधकाऱ्यांनी या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडू न हे द्वार उघडण्याचे आंदोलन केले आहे. या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी अधिक माहिती दिली.
Also see this and subscribe
माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी या प्रसंगीं शिवसेनेने शिवसेनेचा हिसका दाखवून हे द्वार उघडले आहे असे सांगितले. या प्रसंगी शिवसेनेच्या पुढाकाराने हे द्वार उघडण्यात आल्याने शिवसेनेचेव्यापाऱ्यांनी आभार मानले. कृषी उत्पन्न या प्रसंगी, युवा सेना प्रमुख विक्रम राठोड, शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगरसेवक मदन आढाव, संतोष ग्यानप्पा , अमोल येवले, परेश लोखंडे, विशाल वालकर, मनीष गुगळे, आणि व्यापारी वर्गआणि शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
MetroNews is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.
This is India’s Mega media group.
आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.
देश-विदेशातील घडामोडी,
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…
► Get Live updates on https://metronews.co.in/
► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/
► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha
►https://www.youtube.com/metronews
All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.