शिवसेना करणार आलमगीर मध्ये हनुमान चालीसा पठण – शहर प्रमुख संभाजी कदम

भिंगार मध्ये हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम बंद करण्यासाठी मुंडे यांच्या घरात घुसून स्पीकर फोडून जातीय हिंसाचार घडवणाऱ्चा  घाट घालणाऱ्या समाजकंटकांना जर दोन दिवसात अटक केली नाही तरनगर शहर शिवसेना आणि हिंदुत्व वादी संघटना मंगळवारी  आलमगीर येथे जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा सज्जड इशारा शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. संक्रातीच्या दिवशी संपूर्ण शहरभर सायंकाळी ६ वा. लाऊड स्पीकर वर हनुमान चालीसा  पठाण सुरु होते त्यावेळी भिंगार येथे काही समाजकंटकांनी मुंडे यांच्या घरी हनुमान चालीसा पाठ सुरु असताना दमदाटी शिवीगाळ आणि मारहाण करून दहशत निर्माण केली. आणि हनुमान चालीसा पठाण सुरु असलेल्या लाऊड स्पिकरची तोडफोड केली यामुळे भिंगार येथे जातीय तणाव निर्माण झाला होता. या घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने भिंगार येथे तात्काळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. पोलिसांनी या परिसराची नाकाबंदी केली. शहर शिवसेनेच्या कार्यकार्य्त्यानी भिंगार येथे जाऊन मुंडे परिवाराला आणि त्या भागाला संरक्षण दिले. हिंदू संघटनेचे कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी पोहोचले. आणि या घटनेचा निषेध केला. पोलिसांनी तात्काळ त्या समाजकंटकांना अटक करावी अशी मागणी केली. आता परिस्थिती नियंत्रणा खाली असून परिसरात शांतता प्रस्थापित झाली आहे. तरी देखील या घटनेला कारणीभूत ठरलेल्या आरोपी सोहेल शेख आणि त्याचे ३ ते ४ चार गुंड साथीदार तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसे न झाल्यास आलमगीर येथे जाऊन हिंदुत्ववादी संघटना हनुमान चालीसा करतील असा इशारा त्यांनी दिलाय