श्रीगोंद्यात धक्कादायक आंदोलन!

स्मशानभूमीतच नागरिकांचे आमरण उपोषण “पाणी नाही, स्मशानभूमी नाही… आता जगायचं कसं?”

🚨
श्रीगोंद्यात धक्कादायक आंदोलन!

👉 स्मशानभूमीतच नागरिकांचे आमरण उपोषण 💥
👉 “पाणी नाही, स्मशानभूमी नाही… आता जगायचं कसं?”

📍 श्रीगोंदा | पोलीस न्यूज नेटवर्क

तालुक्यातील अजनूज गावात प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप फुटला! 😡
स्मशानभूमीची जागा वादग्रस्त, पिण्याच्या पाण्याची योजना बंद – या दोन ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी थेट स्मशानभूमीत आमरण उपोषण सुरू केलं.

❌ नागरिकांची आक्रोशपूर्ण हाक

  • स्मशानभूमीसाठी निधी आला पण जागेचा गोंधळ अजूनही कायम ⚠️
  • ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत पाणी योजना गेल्या वर्षभरापासून ठप्प 🚱
  • विहिरीवर ट्रान्सफॉर्मर नाही, त्यामुळे थेंबभर पाणी नाही 💧

“माणूस मेल्यावर स्वर्गात जातो म्हणतात… पण अजनूजमध्ये मृतदेहांनाही नरकयातना भोगाव्या लागतायत!” – ग्रामस्थांचा संताप.

🪔 उपोषणाची ठिकाणं = स्मशानभूमीच!

१८ ऑगस्ट रोजी वळणेश्वर मंदिरासमोरील स्मशानभूमीत उपोषण सुरू.
👉 यात सोसायटी चेअरमन राजेंद्र गिरमकर, उपसरपंच विशाल कवडे, सरपंचपती योगेश गिरमकर आणि गावातील अनेक नागरिक सहभागी.

⚡ राजकीय दखल

 

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी उपोषणस्थळी भेट देऊन प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. पण ग्रामस्थांचा सवाल कायम –
👉 “आश्वासनं किती दिवस? समाधान कधी मिळणार?”