“सोशल मीडियावर खोटं ऐकून समाज भरकटतोय!”
देशमुख म्हणाले, "मोबाईलमुळे संवाद कमी आणि फेक न्यूज जास्त! खोट्या गोष्टी पचवणारा समाज तयार होतोय. विचारवंत, संत, समाजसुधारकांचं वाचनच होत नाही, मग दिशा कुठून मिळणार?"

देशमुख म्हणाले, “मोबाईलमुळे संवाद कमी आणि फेक न्यूज जास्त! खोट्या गोष्टी पचवणारा समाज तयार होतोय. विचारवंत, संत, समाजसुधारकांचं वाचनच होत नाही, मग दिशा कुठून मिळणार?”
“प्रत्येक घरात ही 4 पुस्तकं हवीच!”
ज्ञानेश्वरी
तुकाराम गाथा
शिवचरित्र
आंबेडकरांचे ‘भारत-पाकिस्तान फाळणी’
“ही चार पुस्तकं घरात नसतील, तर समाज अंधारातच राहील!” – देशमुख
“शिक्षणाची गंगा आज ‘गटारगंगा’ कधी झाली, कळलंच नाही!”
भाऊराव पाटील, रा.वी. पाटणकर यांच्यासारख्या विभूतींनी ग्रामीण भागात शिक्षण पोहोचवलं, पण आजच्या काळात शिक्षणाची गती, दिशा आणि मूल्यं हरवली आहेत, अशी खंत देशमुख यांनी बोलून दाखवली.
“आई-वडिलांना दारूचे पैसे न दिल्यामुळे मुले मारताहेत!”
देशमुख यांनी आजच्या समाजातील बिघडलेल्या मानसिकतेवर देखील रोखठोक भाषेत टीका केली. “राम, कृष्ण, शिवाजी, आंबेडकर… सगळे विसरत चाललोय, फक्त Show-Off वाढतोय!”
कार्यक्रमात उपस्थित मान्यवर:
बाबा चौधरी (अध्यक्ष), सुरेश कोते, वकील अनिल आरोटे, प्रकाश टाकळकर, संतोष साबळे, मंजूषा काळे आदी.
समता फाउंडेशन + रोटरी क्लब = 110 रुग्णांची नेत्र तपासणी
त्यापैकी 15 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
१०वी-१२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा ‘मिशन प्रवेश’ कार्यक्रम
“वाचन वाढवा – समाज वाचवा!”