सोलापुरकरांचा फेवरेट ‘चहा-चपाती’ ब्रेकफास्ट – आरोग्याचा दोस्त की धोका?
आपली लाइफस्टाइल थेट आपल्या हेल्थवर परिणाम करते.

सोलापुरकरांचा फेवरेट ‘चहा-चपाती’ ब्रेकफास्ट – आरोग्याचा दोस्त की धोका?
सोलापूरकरांच्या सकाळची एनर्जी म्हणजे ‘चहा-चपाती’!
पण हा कॉम्बो खरोखर हेल्दी आहे का? यावर आहारतज्ज्ञ नम्रता बोल्ली यांचं मत सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 
नम्रता बोल्ली सांगतात – आपली लाइफस्टाइल थेट आपल्या हेल्थवर परिणाम करते. त्यामुळे हेल्दी ब्रेकफास्ट घेणं खूप गरजेचं आहे.
पण बऱ्याच लोकांना पोहे, उपमा वगैरे नको असलं तर ते सरळ चहा-चपातीवर जातात. हा सोलापूरचा ‘क्लासिक ब्रेकफास्ट’ असला, तरी रोजची सवय आरोग्यासाठी काही वेळा रिस्की ठरू शकते. 
चहा-चपातीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट्स:
फायदे:
- चपातीत कार्बोहायड्रेट्स, फायबर, काही जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे दिवसभर एनर्जी देतात
![⚡]()
- पचन सुधारायला मदत
![💪]()
- चहा (साखर कमी करून) घेतल्यास शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत
तोटे:
- चहात असलेले फिनोलिक केमिकल्स शरीरातील लोहाचे शोषण कमी करतात
![🩸]()
- चपाती + गोड चहा = जास्त कॅलरीज
वजन वाढण्याचा धोका ![📈]()
- कॅफिन आणि साखरेचे जास्त प्रमाण लठ्ठपणा, पोषक तत्त्वांची कमतरता आणि झोपेवर परिणाम करू शकते
![😴]()
बोल्लींचा सल्ला – चहा-चपाती रोजच्या नाश्त्यात नको, अधूनमधून चालेल. शक्यतो चपाती भाजीसोबत घ्या आणि चहाचा साखर-कॅलरी लेव्हल कंट्रोल ठेवा. 
तर मंडळी, ‘चहा-चपाती’ फक्त टेस्टी नाही, तर हेल्थी ठेवायची असेल तर थोडा बॅलन्स हवाच!
#TeaChapati #SolapurStyle #HealthyBreakfast



वजन वाढण्याचा धोका 
