✨🚩 नवरात्रीत महिलांसाठी खास भेट! आकाश बाफना यांचा स्तुत्य उपक्रम 🚩✨
नवरात्रीचा उत्साह, देवीची आराधना व सामाजिक बांधिलकी – या तिन्ही गोष्टी एकत्र आणणारा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे .
Share
नवरात्रीत महिलांसाठी खास भेट! आकाश बाफना यांचा स्तुत्य उपक्रम
जामखेड शहर नेहमीच सामाजिक कार्यात आघाडीवर राहणारे, आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष व युवा उद्योजक आकाश दिलीप बाफना यांनी या नवरात्रीत महिलांसाठी एक खास उपक्रम राबवला आहे . देवीभक्त भगिनींना श्री क्षेत्र मोहटादेवी दर्शनाचा आनंद मिळावा यासाठी २४ व २५ सप्टेंबर रोजी खास बसची मोफत सोय करण्यात आली आहे .
महिलांसाठी दर्शन यात्रा सकाळी ८ वाजता सुरू होईल. प्रस्थानस्थान – आपले प्रभाग व नवीन पोलीस स्टेशन, जामखेड समोरून. दर्शनानंतर महाप्रसाद व फराळाची सोय. संपर्कासाठी क्रमांक : 8400200240 / 7031004004
महिलांना सुरक्षित, सोयीस्कर व आनंददायी वातावरणात देवीचे दर्शन व्हावे, यासाठी आकाश बाफना व त्यांचा मित्र परिवार दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. हे आयोजन पूर्णपणे विनामूल्य आहे, ज्यामुळे हजारो भगिनींना सहज दर्शनाचा लाभ घेता येईल .
आकाश बाफना यांनी याआधीही शहरातील पूल दुरुस्ती , मंदिर दुरुस्ती , गणेश मंडळांचा सन्मान , सामाजिक मदतकार्य असे अनेक उपक्रम राबवले आहेत. आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे .
नागरिकांचा प्रतिसादही या उपक्रमाला प्रचंड मिळत आहे. नवरात्रीसारख्या मंगल काळात महिलांसाठी खास सोय उपलब्ध करून देणे म्हणजेच समाजातील अर्ध्या लोकसंख्येला सन्मान देण्यासारखे आहे .
नवरात्रीचा उत्साह, देवीची आराधना व सामाजिक बांधिलकी – या तिन्ही गोष्टी एकत्र आणणारा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे . जामखेडमधील अनेक भगिनी या यात्रेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
या संधीचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा आणि देवीचे दर्शन घेऊन आयुष्यात मंगलमयता आणावी, असे आवाहन आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश दिलीप बाफना यांनी केले आहे .
मेट्रो पोर्टलचा सलाम अशा सामाजिक बांधिलकीला! देवीच्या आशीर्वादाने हा उपक्रम अधिक यशस्वी होवो हीच शुभेच्छा!