अहिल्यानगर पोलिसांत खळबळ!

लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

💥
अहिल्यानगर पोलिसांत खळबळ!

🚨 लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला – 20 हजार मागणी, 3 हजार घेताच सापळा यशस्वी!

📍 अहिल्यानगर / श्रीगोंदा
अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलिस दलात मोठा धक्का – पोलिस कॉन्स्टेबल संभाजी शिवाजी घोडे (वय 32) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं!

🔍 काय घडलं?
श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदाराच्या मुलाच्या प्रकरणात “मध्यस्थी” करून, मोबाईल परत देण्यासाठी 20 हजारांची लाच मागणी, शेवटी तोडजोडीनंतर 3 हजार रुपयांवर डील.

💰 सापळा कारवाई –
11 व 12 ऑगस्ट रोजी पडताळणीनंतर, 12 तारखेला स्वतःच्या हाताने 3 हजारांची लाच घेताना कॉन्स्टेबलला ACB पथकाने जागीच ताब्यात घेतले.

⚖️ गुन्हा नोंदणी –
श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू.

👮‍♂️ कारवाई पथक –

  • DYSP अजित त्रिपुटे (तपास प्रमुख)
  • पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे
  • पोलीस कॉन्स्टेबल रवी निमसे, बाबासाहेब कराड, वैभव सुपेकर
  • चालक हवालदार हारून शेख, हवालदार लाड

📢 ACB चं आवाहन –

“कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असेल, तर तात्काळ ACB ला संपर्क करा.”

📞 संपर्क क्रमांक:

 

  • दुरध्वनी: 0241-2423677
  • मोबाईल: 8329701344
  • टोल फ्री: 106