स्नेहालय संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांद्वारे मोफत नेत्रसेवा
अहमदनगर दि.२८ ऑक्टोबर २०२०:
अनाथाश्रमात शिकताना मिळालेल्या समाजाच्या मदतीची अंशतः परतफेड करण्यासाठी शुभम शोर आणि मिरेन गायकवाड या नवउद्योजकांनी मोफत नेत्रसेवा करणार आहेत . त्यांनी आता आजन्म मोफत डोळे तपासण्याचा संकल्प केला आहे. …