अनैतिक नात्याचा शेवट… विवाहित महिलेचा खून! जाखुरी हादरलं – प्रियकर की नवरा?
खूनाचा संशय आणि दुहेरी कोन
अनैतिक नात्याचा शेवट… विवाहित महिलेचा खून!
जाखुरी हादरलं – प्रियकर की नवरा?
संगमनेर तालुक्यातील जाखुरी गावात रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मूळच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संगिता भारत मोरे (वय 40) या विवाहित महिलेचा संशयास्पद मृतदेह सापडला असून, तिचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, संगिता मोरे गेल्या आठ-दहा दिवसांपासून आपल्या पतीसह जाखुरीत मुलीकडे मुक्कामी होती. पण रविवारी रात्री तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराने तिला भेटण्यासाठी भेट दिली होती. दुसऱ्याच दिवशी सकाळी तिचा मृतदेह घरापासून काही अंतरावर मिळाला… आणि सगळं गाव हादरलं. 
खूनाचा संशय आणि दुहेरी कोन
पोलिसांच्या प्राथमिक तपासात गळा आवळल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. यामुळे खून झाल्याचा ठोस संशय आहे. तपास पथकाने दोन्ही बाजूने शोध सुरू केला आहे –
प्रियकर – जो रविवारी रात्री आला होता आणि सध्या गायब आहे. 
पती – ज्याच्यावरही संशय आहे आणि जो पोलिसांच्या ताब्यात आहे.
प्रियकराचा काही ठावठिकाणा मिळालेला नसल्याने त्याच्यावरील संशय अधिक गडद झाला आहे. पोलिस पथके त्याच्या शोधात रवाना झाली आहेत, पण तो हाती लागेपर्यंत प्रकरणाचं रहस्य उलगडणार नाही.
घटनास्थळी फॉरेन्सिक आणि ठसेतज्ज्ञ
घटनास्थळी ठसेतज्ज्ञ आणि न्यायवैद्यक तपास पथक पोहोचले असून, सर्व पुरावे गोळा केले जात आहेत. यावेळी पोलिस उपअधिक्षक कुणाल सोनवणे, निरीक्षक प्रवीण साळुंखे आणि पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.
नवीन PI साठी पहिलेच आव्हान
संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्यासाठी ही पहिलीच मोठी कसोटी ठरली आहे. नियुक्तीच्या फक्त दोन दिवसांत असा खळबळजनक खून उघडकीस आला असून, गावात प्रचंड चर्चा रंगली आहे.
जाखुरी आणि परिसरात एकच चर्चा – “प्रियकराने मारलं की नवऱ्याने?” 
तपास सुरू आहे… पण सत्य बाहेर येईपर्यंत गावाचं लक्ष पोलिसांच्या हालचालींकडेच आहे. 

#जाखुरीखूनकांड #CrimeNews #Sangamner #BreakingNews #MaharashtraCrime

जाखुरी हादरलं – प्रियकर की नवरा?
खूनाचा संशय आणि दुहेरी कोन
नवीन PI साठी पहिलेच आव्हान