अमेरिकेत करोनाचा वाढता कहर

१ कोटींहून अधिक नागरिक कोरोना बाधित 

वॉशिंग्टन : 

 

युरोपीयन देशांमध्ये करोनाची दुसरी लाट आली असून बाधितांची संख्या वाढत आहे.  तर, दुसरीकडे अमेरिकेत करोनाचा कहर सुरूच आहे.  अमेरिकेत करोनाबाधितांची संख्येने एक कोटींचा आकडा ओलांडला आहे.  जगभरातील सर्वात जास्त करोनाबाधित अमेरिकेत आहेत.  जगभरातही करोनाबाधितांच्या संख्येने पाच कोटींचा आकडा ओलांडला आहे.

अमेरिकेत मागील १० दिवसांत एक लाख बाधितांची नोंद करण्यात आली आहे.  अमेरिकेत करोनाची तिसरी लाट सुरू असल्याचे म्हटले जात आहे.  शनिवारी अमेरिकेत एक लाख ३१ हजार ४२० करोनाबाधितांची नोंद करण्यात आली.   ही आतापर्यंतची एका दिवसात सर्वाधिक संख्या असल्याचे ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.  मागील सात दिवसात चार वेळेस एक लाख व त्याहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली.