चितळे रोडवर धाडसी चोरी करणारे तिघे जेरबंद! पुणे एअरपोर्टवर थरारक कारवाई, पोलिसांची शाब्बासकी!
एलसीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी!
चितळे रोडवर धाडसी चोरी करणारे तिघे जेरबंद!
पुणे एअरपोर्टवर थरारक कारवाई, पोलिसांची शाब्बासकी! ![👮♂️]()
![🛫]()
अहिल्यानगर |
3 ऑगस्टच्या मध्यरात्री, शहरातल्या प्रसिद्ध D. चंद्रकांत कपड्यांच्या दुकानात एक मोठी चोरी झाली होती. चोरट्यांनी दुकान फोडून तब्बल ₹2.5 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता.
या घटनेमुळे व्यापार्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं
आणि पोलिसांपुढेही एक मोठं आव्हान उभं राहिलं होतं. पण… पोलिसांनी हे आव्हान जबरदस्तपणे स्वीकारत 3 गुन्हेगारांना विमानतळावरून अटक केली!
एलसीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी!
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनंतर एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली एक खास पथक तयार करण्यात आलं. पथकाने गुप्त माहिती, CCTV फूटेज आणि प्रोफेशनल तपासाच्या जोरावर शोध सुरू केला.
तपासादरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी पुणे विमानतळावरून बिहारला पलायन करण्याच्या तयारीत आहेत! 
तेवढ्यात पोलिसांनी तात्काळ सापळा रचून खालील 3 आरोपींना रंगेहाथ अटक केली:
मेहताब उर्फ आयान उर्फ जल्ला शाफीयाना शेख – MIDC, पुणे
अश्फाक दिलशाद शेख – ज्योतिबा नगर, काळेवाडी
निसार अली नजर मोहम्मद – हवेली, पुणे
अजून एक धक्का: याच टोळीने पुण्यातही केली होती घरफोडी!
तपासादरम्यान समोर आलं की या टोळीने फक्त नगरमध्येच नाही, तर पुण्यातही चोरी केली होती.
विशेष बाब म्हणजे एक आरोपी वयाने लहान असून नुकताच गुन्हेगारी जगतात सक्रिय झाला आहे, आणि तो सध्या खुणाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर होता! 
चोरलेले पैसे बँकेत ऑनलाइन ट्रान्सफर!
आरोपी दिलशाद शेख याने चोरी केलेले ₹1.98 लाख ATM मशीनद्वारे त्याच्या बहिणीच्या बँक खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर केल्याचे उघड झाले आहे. 


कोणीतरी ‘लाईक’ करा या सुपरहिट पथकाला! ![🔥]()
ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या टीमने केली. त्यांच्या टीममध्ये सहभागी होते:
हरीश भोये, राजेंद्र वाघ, शाहिद शेख, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, रोहित येमुल, सागर ससाने, अमृत आढाव, प्रशांत राठोड, भगवान धुळे, अर्जुन बडे आणि संपूर्ण एलसीबीची टीम! 
मेट्रो पोर्टलचा salute ![💥]()
पोलीस प्रशासनाच्या वेळेवर आणि स्मार्ट कारवाईमुळे ही मोठी चोरी उघडकीस आली. अशा धाडसी टीमला एक जोरदार
द्यायलाच हवा!
शेअर करा, कमेंट करा आणि असा पोलिसांचा अभिमान सगळ्यांपर्यंत पोहोचवा!
#MetroNews #AhilyanagarCrimeNews #LCBSuccess #PuneAirportCatch #BoldPoliceAction #DChandrakantChori #CitySafetyFirst #ChitaleRoadCrime #गुन्हेगार_गजाआड 

पुणे एअरपोर्टवर थरारक कारवाई, पोलिसांची शाब्बासकी! 

एलसीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी!
अजून एक धक्का: याच टोळीने पुण्यातही केली होती घरफोडी!
चोरलेले पैसे बँकेत ऑनलाइन ट्रान्सफर!
कोणीतरी ‘लाईक’ करा या सुपरहिट पथकाला! 
मेट्रो पोर्टलचा salute 