महा आघाडीचा गोंधळ कायम! आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढायच्या की स्वतंत्र?अजूनही निर्णय नाही!
उद्धव ठाकरे यांना त्यांच्या नेत्यांची स्वतंत्र लढण्याची मागणी:

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महानगरपालिका, जिल्हा परिषद इ.) निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. पण महाविकास आघाडीत (उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट) निवडणुका एकत्र लढायच्या की स्वतंत्र, यावर अजूनही स्पष्टता नाही.
शरद पवार यांची भूमिका:
पुण्यात शरद पवार म्हणाले, “आमची इच्छा आहे की महाविकास आघाडी एकत्र लढावी. काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शेकाप आणि इतरांनी एकत्र बसून चर्चा करावी आणि सामूहिक निर्णय घ्यावा.” ते पुढे म्हणाले की, आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे निवडणुका लांबवता येणार नाहीत आणि साधारण ३ महिन्यात निवडणूक प्रक्रिया सुरू होईल.
उद्धव ठाकरे यांना त्यांच्या नेत्यांची स्वतंत्र लढण्याची मागणी:
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये जिल्हाप्रमुख व संपर्क प्रमुखांची बैठक घेतली. यात अनेक जिल्हाप्रमुखांना स्पष्ट सांगितलं की, “आपण स्वतंत्र लढायला हवं.” माजी खासदार विनायक राऊत यांनी याबाबत माहिती दिली.
मनसेसोबत युती बाबत जनतेचे मत घेणार!
मनसेसोबत युती करायची की नाही, यावर जनतेचं मत घ्यायचं आणि महिनाभरात याचा आढावा द्यायचा असा निर्णय बैठकीत झाला.
उद्धव ठाकरे यांनी मतदार यादीत झालेल्या वाढीबाबतही चिंता व्यक्त केली आणि “बोगस मतदारांची नोंदणी होऊ देऊ नका,” अशा सूचना दिल्या.
आगामी अधिवेशनाची तयारी:
ठाकरे यांनी आमदारांना स्नेहभोजन बोलावून राज्य विधिमंडळ अधिवेशनात कोणते मुद्दे मांडायचे यावरही चर्चा केली.
एकत्र येतील का स्वतंत्र लढतील?
सर्व पक्ष एकत्र येतात की वेगवेगळे रस्ते घेतात, हे येत्या काळात स्पष्ट होईल. पण निवडणूक तयारीचा धूरळा मात्र सुरु झाला आहे!
तुमच्या मताने महाविकास आघाडीने एकत्र निवडणुका लढाव्यात की स्वतंत्र? तुमचे मत कमेंट मध्ये लिहा!
#MahaVikasAghadi #LocalBodyElections #UddhavThackeray #SharadPawar #PoliticalUpdate #MaharashtraPolitics