विखे-थोरात जुगलबंदी सुरूच!

अहिल्यानगर : ‘ताई तुम्ही मला धमकी दिली; पण मी घाबरणारा माणूस नाही. आम्ही जनतेला ‘माय बाप’ मानतो. तुम्ही आमदार जनतेचा बाप आहे असे म्हणतात; पण आता जनता दाखवेल ‘बाप कोण आहे’, असा शब्दात माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा थोरात यांच्यावर टीका केली. विखे यांनी येथे मेळावा घेतला. डॉ.जयश्री थोरात यांनी सुजय विखे यांच्यावर टीका करताना ‘खरबदार, माझ्या बापाबद्दल बोलाल तर अशी टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना विखे म्हणाले, दिवंगत बाळासाहेब विखे यांनी आम्हाला जनतेला मायबाय म्हणायला शिकवले; पण आमच्या ताई म्हणतात की या तालुक्याचे आमदार हे सात लाख जनतेचे बाप आहेत, असे आपण पहिल्यांदाच ऐकले. गोरगरीब जनतेचा बाप हे काढत आहेत. त्यामुळे जनताच आता दाखवेल बाप कोण आहे ते. या तालुक्यात दहशत आहे. त्या दहशतीची वेळ आता संपली आहे. निवडणुकीत येथील जनता दहशत संपवेल, असे ते म्हणाले.