तीनदा निविदा काढूनही ऑक्सिजन प्लांटची प्रतीक्षा

फेरप्रस्तावात सिलिंडर भरवण्याची व्यवस्था , प्लांट खर्च ७५ लाख रुपयांहून जाणार ८६ लाखांवर

       ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मनपाने आतापर्यंत तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही  हा प्लांट उभा राहू शकलेला नाही . यापूर्वीच्या प्रस्तावात सिलिंडर भरण्याच्या व्यवस्थेचा समावेश नसल्याने पुन्हा प्रशासकीय मान्यता घेऊन प्रस्ताव तयार केला जाणार आहे . परंतु , मनपाकडे प्लांटसाठीचा  प्रस्ताव तयार करण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने स्वतंत्र एजन्सी नेमून फेरप्रस्ताव तयार करावा की , मनपा स्तरावरच  करावा असा संभ्रम प्रशासनासमोर  आहे.

 

 

 

 

     हे ही पहा आणि सबस्क्राईब करा . 

       कोरोनाची पहिली लाट नियंत्रणात येण्यासाठी जानेवारी २०१९ पर्यंत वाट पहावी लागली . पण, कोरोना पूर्णपणे हद्दपार झालाच नाही . त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकात मोठी हानी झाली . ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांचे जीव धोक्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मनपाने तातडीने ऑक्सिजन प्लांट उभारणीचा निर्णय त्याचवेळी घेतला होता . सुरुवातीला  पीएसए  तत्वावर ( हवेतून ऑक्सिजन निर्मिती ) प्लांट उभारणी निविदा प्रक्रिया राबवली होती . यासाठी सुमारे १ कोटी ४० लाखाच्यानिविदेला स्थायीकडून मंजुरी घेतली होती . पण मुख्य सचिवांनी विडिओ कॉन्फरन्स लीक्वीड पद्धतीचा मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) टॅंक उभारणीचे आदेश दिले  त्यामुळे स्थायीत मंजूर झालेली निविदा मनपा प्रशासनाने रद्द केली . ऑक्सिजन टॅंक उभारण्यासाठी सुधारित प्रस्ताव तयार करून आयुक्तांच्या मान्यतेने तांत्रिक मान्यतेसाठी शहर अभियंत्यासमोर जाईल . यापूर्वी  मनमाने तयार केलेला प्रस्तावच रद्द करण्याची नामुष्की ओढावल्यामुळे , नवीन प्रस्तावासाठी एजन्सी नेमावी कि मनपा स्तरावरच करावा असा पेच प्रशासनासमोर आहे. नवीन प्रस्तावानुसार ऑक्सिजन भरण्याची व्यवस्था होणार आहे.

 

 

 

 

     जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा शल्यचिकीत्सकानी राबवलेल्या निविदा प्रक्रियेचा  आधार घेऊन संबंधित संस्थेला कार्यारंभ आदेश दिले होते. ४५ दिवसात प्रकल्प सुरु करण्याचे बंधन न पाळल्याने मनपा प्रशासनाने कार्यारंभ आदेशच रद्द  केले . त्यानंतर तर पुन्हा निविदा अल्यानंतर , अनामत रकमेसाठी मनपाने पत्रव्यवहार केला . पण या प्रस्तावात ऑक्सिजन सिलिंडर  भरण्याचा समावेश नसल्याचे कारण पुढे करून हा प्रकल्पच थंडावला . हा प्रकल्प ७५ लाखात मार्गी लागेल , असे सत्ताधारी व प्रशासनाला वाटले होते , परंतु फेरप्रस्तावात  सुधारित बाबी अंतर्भूत करण्यासाठी या प्रकल्पाचा खर्च ८६ लाखावर जाणार आहे . त्यातच मनपा आता प्रस्ताव तयार करण्यासाठी स्वतंत्र  एजन्सी  नेमण्याचा विचार करत आहे.