पुणे-अहिल्यानगर नवीन रेल्वे प्रकल्पाचं स्वागत

पण... "दौंड मार्गे इंटरसिटी तातडीने सुरू करा!" – स्वाती सिरसुल यांची जोरदार मागणी

🚆
 पुणे-अहिल्यानगर नवीन रेल्वे प्रकल्पाचं स्वागत, पण…
“दौंड मार्गे इंटरसिटी तातडीने सुरू करा!” – स्वाती सिरसुल यांची जोरदार मागणी

📍 अहिल्यानगर, 16 जुलै –
“नवीन प्रकल्प ठिक, पण तो पूर्ण होईपर्यंत किती वर्षं थांबायचं?”
सामाजिक कार्यकर्त्या स्वाती सिरसुल यांचा रेल्वे प्रशासनाला थेट सवाल!

📢 मुख्य मुद्दे:
🔸 पुणे-अहिल्यानगर नवीन रेल्वे प्रकल्पाला स्वागत, पण वेळ लागणार – ११६ किमी प्रकल्प, ११,००० कोटी खर्च
🔸 प्रत्यक्षात स्टेशन, रुळ, जमीन संपादनासाठी लागणार अनेक वर्षं
🔸 तोपर्यंत दौंड मार्गे इंटरसिटी रेल्वे तात्काळ सुरू करावी – हजारो प्रवाशांची गरज

⏰ प्रवासाचा त्रास:
🚗 वाहतूक कोंडीमुळे 120 किमीचा प्रवास = 4-5 तास
⛽ इंधनाचा, वेळेचा आणि मन:स्तापाचा मोठा अपव्यय
📚 विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी वर्ग हैराण!

❓ स्वाती सिरसुल यांचा सवाल:
“दौंड जंक्शनजवळ रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर असूनही इंटरसिटी अजून का नाही?”
📉 नागरिकांमध्ये नाराजी शिगेला – रेल्वे प्रशासनाकडून कोणताही खुलासा नाही!

 

🤝 आवाहन:
राजकीय नेते, सामाजिक संस्था, नागरिक एकत्र येऊन आवाज उठवा!
“इंटरसिटी आता हवीच!”