देशातील १४.५ लाख महिला पंच, सरपंचांना मिळेल स्वसंरक्षण प्रशिक्षण!
देशभरातील ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेल्या १४.५ लाख महिला पंच, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळणार आहे. सोबतच निवडून आलेले १७.५ लाख पुरुष पंच, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना महिलांच्या सुरक्षेबाबत अधिक जागरूक व सजग बनवण्यासाठी विशेष अभियान राबवले जाईल. यावर केंद्र निर्भया निधीतून ७५२.२६ कोटी रु. खर्च करेल. निर्भया निधीची नोडल एजन्सी महिला व बालविकास मंत्रालयाने पंचायत राज मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. निर्भया निधीतील ३४३ कोटी महिलांच्या प्रशिक्षणावर व ४०९ कोटी जनजागृती अभियानावर खर्च होतील.
◆ निर्भया निधीचा वापर केवळ महिलांच्या सुरक्षिततेसाठी केला जाईल!
◆ मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, निर्भया निधीचा वापर केवळ महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि विशेषतः सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या योजनांसाठीच करण्याची तरतूद आहे.
◆ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये महिलांवरील गुन्ह्यातील पीडितांना मदतीचा दावा करण्याच्या तंत्राचा अभाव आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तयार केला आला आहे. यातून न्याय मिळण्याचा आत्मविश्वास वाढेल.
अधिक महिला अत्याचाराची तक्रार करू शकतील.