अहिल्यानगर शहरातील तृतीयपंथी यांनी केला भाजपात प्रवेश

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तृतीयपंथीचे अध्यक्ष काजल गुरु यांच्यासह असंख्य तृतीयपंथ्यानी केला प्रवेश

अहिल्यानगर शहरातील तृतीयपंथी यांनी केला भाजपात प्रवेश

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील तृतीयपंथी यांच्या अनेक वर्षापासून विविध समस्या असून त्या सोडवल्या जात नाही व तृतीयपंथी समाजाकडे नेहमी दुर्लक्ष होत असल्याने तृतीयपंथी समाजाचे अध्यक्ष काजल गुरु यांनी तृतीयपंथीयांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी व न्याय मिळावा या हेतूने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रवेश केला यावेळी असंख्य तृतीयपंथी उपस्थित होते तसेच महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, तृतीयपंथींचे अनेक प्रश्न व समस्या सोडवण्यात येणार व एकसमान जगण्याचा अधिकार देणार व अहिल्यानगर जिल्ह्यात लवकरच काजल गुरु यांना मोठी जबाबदारी देणार असल्याची भावना व्यक्त केली

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तृतीयपंथीचे अध्यक्ष काजल गुरु यांच्यासह असंख्य तृतीयपंथ्यानी केला प्रवेश

तर काजल गुरु यांनी तृतीयपंथी यांच्या विविध मागणीसाठी अनेक वर्षापासून आंदोलने मोर्चे केलेली आहे व याकडे दुर्लक्ष होत असून अनेक वर्षापासून तृतीयपंथी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व आयुक्तांना विविध मागणी केलेली आहे. तसेच अनेक अडचणी सोडवले जात नसल्याने तृतीय पंथांचे अध्यक्ष काजल गुरु यांच्यासह जिल्ह्यातील तृतीयपंतांनी भाजपाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.