आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे भीक मांगो आंदोलन.
मातंग समाजाच्या आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या ताकतोडे कुटुंब शासन निधी पासून वंचित.
मातंग समाजाच्या अ. ब. क. ड. आरक्षण मागणीसाठी जलसमाधी घेणाऱ्या संजय ताकतोडे यांचा कुटुंब शासन निधी पासून वंचित असल्यामुळे आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन भीक मागो आंदोलन करताना आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष नगीनाताई सोमनाथ कांबळे, संतोष शिंदेअहमदनगर जिल्हाअध्यक्ष, किरण उमाप जिल्हा महासचिव, नंदू उल्हारे सल्लागार, जालिंदर थोरात कार्याध्यक्ष, संदीप नेटके, पुणे जिल्हा अध्यक्ष, अडागळे महाराज राज्य सल्लागार, मीना साठे, आकांक्षा पवार, अतुल खुडे, शत्रुघन डाडर, राजेंद्र राजगुरू, अजय शिंदे, नागेश डाडर, सुनील सकट, सचिन नवगिरे, युवराज ओचर आदी सह आधुनिक लहुजी सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मातंग समाजाला अ. ब. क. ड. नुसार स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी बीड जिल्ह्यातील संजय ताकतोडे यांनी बिंदुसरा जलशया मध्ये जलसमाधी घेऊन आपले जीवन संपवले त्या कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत अद्यापही मिळाली नाही या घटनेला अडीच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या टाकतोंडे कुटुंबास तात्काळ मदत मिळवून देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी आधुनिक लहुजी सेना अहमदनगर जिल्ह्याच्या संघटनेची प्रलंबित मागणी आहे. त्यामुळे संजय ताकतोडे यांच्या कुटुंबीयांना शासकीय निधी कोणतीही भेटलेली नसून त्यामुळे आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करून भीक मागो आंदोलन सुरुवात करण्यात आली भीक मागत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन निवेदन व जमलेले पैसे देण्यात आले व मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये वर्ग करून ताबडतोब कुटुंबाला मदत करावी तसेच जिल्ह्यामध्ये मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचार संदर्भात देखिल निषेध व्यक्त करण्यात आले. तसेच संजय ताकतोडे यांच्या कुटुंबांना व्यापकर मदतीसाठी शासनाने तात्काळ निधी देण्याचा निर्णय घ्यावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले आहे.