इस्राईलचे इराणवर भीषण हल्ले

लष्करी मुख्यालय, फोदो अनुतळ व इविन तुरुंग उद्ध्वस्त

🌍
इस्राईलचे इराणवर भीषण हल्ले; लष्करी मुख्यालय, फोदो अनुतळ व इविन तुरुंग उद्ध्वस्त

तैल-अवीव / तेहरान : अमेरिकेच्या हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इस्राईलने पुन्हा इराणवर जोरदार हवाई हल्ले चढवले. तब्बल ५० जेट्सनी इराणची राजधानी तेहरानसह आठ शहरांवर क्षेपणास्त्राचा मारा केला.

🔥 या हल्ल्यात १३ लष्करी मुख्यालये, रिव्होल्युशनरी गार्ड्सचे ठिकाणे आणि बसिज निमलष्करी दलाच्या इमारती उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार अनेक सैनिक जखमी झाल्याची शक्यता आहे, मात्र इराण सरकारने अद्याप याची अधिकृत पुष्टी केलेली नाही.

🚨 तेहरानमधील प्रसिद्ध इविन तुरुंगावरही क्षेपणास्त्रांनी हल्ला झाला आहे. या तुरुंगात राजकीय कैद्यांना ठेवले जाते. हल्ल्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओत मुख्य गेट उद्ध्वस्त झालेले दिसत आहे.

💣 फोदो अनुतळावर पुन्हा बॉम्बहल्ला
रविवारी अमेरिकेने फोदो अनुतळावर हल्ला केला होता आणि त्यानंतर इस्राईलनेही याठिकाणी पुन्हा हल्ला केला आहे.

 

⚡ इराणचे प्रत्युत्तर : ऑपरेशन टू प्रॉमिस-3
या हल्ल्यानंतर इराणने सोमवारी इस्राईलच्या हायफा, तेल अवीव आणि जेरुसलेम शहरांवर क्षेपणास्त्रांचे हल्ले केले.
इराणचे प्रवक्ते इब्राहिम झोल्पागरी यांनी इशारा दिला की, “पुढील ४८ तासांत इराण अमेरिकी सैन्यांवर हल्ला करेल. अमेरिकेने हे युद्ध सुरू केले आहे, पण आम्ही ते संपवू.”