एनएसएस शिबिर नीतीमूल्यांची शिदोरी – युवा नेते अक्षय कर्डिले
महाविद्यालयीनस्तरावर आयोजित केलेले जाणारे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर विद्यार्थ्यांना नीतीमूल्यांची शिकवण देणारी शिदोरी असते, असे प्रतिपादन युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केले.
स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सव वर्षाअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बुऱ्हाणनगर, मा. आ. शिवाजीराव कर्डिले कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व एकता शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व महाविद्यालय सावेडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आज जांब कौडगाव येथे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाणेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. जाधव, मा. आ. शिवाजीराव कर्डिले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप मोटे, एकता महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. राजेंद्र मेहेत्रे, सरपंच धनंजय खर्से, बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब खर्से, प्रा. डॉ. व्ही. एम. जाधव, प्रा. डॉ. बी. एम. मुळे, डॉ. राजमोहमंद शेख, प्रा. राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.
युवा नेते अक्षय कर्डिले म्हणाले, की महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांने राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिरामध्ये सहभाग घेतला पाहिजे. राष्ट्रप्रेम, समाजसेवा, समता, बंधुता, धर्मनिपेक्षता, एकात्मता अशा नीतीमूल्यांची शिकवण आपल्याला राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून मिळते. तर, शिक्षणाचे जिवनामधील महत्त्व कळते. विद्यार्थ्यांना सामाजिक भान येऊन ते योग्य दिशेने मार्गक्रमण करतात. महापुरूषाचे विचार, श्रमदान, संतांचे विचार मिळण्याचे ठिकाण म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर होय. त्यासाठी महाविद्यालयीन, विद्यापीठीय, विभागीय, राज्यस्तरावर राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आयोजित केले जाते. यावेळी प्राचार्य डॉ. एस. एस. जाधव, डॉ. दिलीप मोटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तीनही महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. के. एस. जाधव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मनीषा पुंडे यांनी केले. तर, प्रा. मानसी जाधव यांनी आभार मानले. शिबिर यशस्वीतेसाठी एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. के. एस. जाधव, प्रा. सागर कोहक, प्रा.डॉ. सुजाता सोनवणे, प्रा. रोहित कांबळे, प्रा. सागर भोईटे, प्रा. पगारे, प्रा. कवळे, प्रा. रणशूर आदी परिश्रम घेत आहे.