किराणा दुकानात मद्य विकू देणार नाही – विखे
राहता — शिर्डी मतदार संघातील कोणत्याही किराणा दुकानात मद्य विक्री करू देणार नाही , किराणा दुकानात मद्य सुरु करण्याचा राज्य सरकारचा निर्णयाला कडाडून विरोध करणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ सुजय विखे यांनी केले . लोणी (ता. राहता) येथील श्री वरद विनायक सेवाधामचा स्वागत कमानीचे उदघाटन डॉ सुजय विखे यांचा हस्ते दिनांक ४ रोजी झाले . त्यावेळी ते बोलत होते . सेवाधामचे संथपक महंत उद्धव मंडलिक महाराज .जगन्नाथ पाटील महाराज ,विश्वनाथ मंडलिक महाराज , ट्रक सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर राठी , बाळासाहेब आहेर या वेळी उपस्थित होते .