कोपरगावचा आठवडे बाजारात भर दुपारी तरुणाचा खून
कोपरगाव शहरात ३ जानेवारी रोजी आठवडे बाजारात भर दुपारी साडे तीन चा सुमारास ७ ते ८ जणांनी रॉड ,फावढ्याचा दांडा , दगडाने ठेचून मारहाण करत पस्तीस वर्षाचा तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे . राजा भोसले (वय ३५ ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे . तो शिंगणापूर येथील तरुण आहे . मयत राजा भोसले याला शहरातील संत जनार्धन हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे . या तरुणाला सात ते आठ जणांचा टोळक्याने बेदम मारहाण केली व दोन मोटार सायकली तेथेच सोडून पोबारा केला आहे ,
कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटना स्थळी धाव घेतली ,आरोपींचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांची पथके चौफेर रवाना झाली आहेत . सोमवारी कोपरगावचा आठवडी बाजार असतो यावेळी दुपारचा वेळेत बाजारात खूप गर्दी असते . बाजार तालाचा मध्यवर्ती भागा स खेटून जुन्या काले इमारतीचा पश्चिम बाझुला असलेल्या मोकळ्या जागेत हा प्रकार घडला असून . भर दिवसा आठवडे बाजाराचा भर गर्दीत खुनाचा घटनेमुळे संपूर्ण कोपरगाव शहर हादरले आहे .