ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांत्वन
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांत्वन
नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांचे वडील समता शिक्षण संस्थेचे संचालक व माण तालुका रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष स्व. भगवानराव रामचंद्र गोरे दादा यांचे नुकतेच निधन झाले. सरपंच परिषदेच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या बोराटवाडी (दहिवडी) येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी सरपंच परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, राज्य कोअर कमिटी अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, राज्य कोअर कमिटी उपाध्यक्ष जे.डी. टेमगिरे, कोषाध्यक्ष आनंदराव जाधव, पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय शेलार, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अर्जुनदेवा शेळके, सातारा जिल्हा महिला अध्यक्षा मेघाताई नलावडे, सातारा जिल्हा परिषद सभापती वनिताताई गोरे, सातारा जिल्हा सचिव शत्रुघन धनावडे, सातारा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख नंदकुमार उर्फ ए.टी.डी. डोईफोडे, कोरेगाव तालुका उपाध्यक्ष गोविंदराव कदम, खटाव तालुका अध्यक्ष लालासाहेब माने, सातारा तालुका महिला अध्यक्षा मेघाताई माने, सातारा जिल्हा सचिव हनुमंत देवरे, सातारा तालुका उपाध्यक्ष राहुल डांगे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडके यांच्यासह राज्य कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते.
स्व. भगवानराव गोरे यांना वाहिली श्रध्दांजली
सरपंच परिषदेच्या वतीने स्व. भगवानराव गोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. स्व. भगवानराव गोरे हे परिसरात दादा नावाने परिचित होते. बोराटवाडी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन असताना त्यांनी शेतकरी सर्वसामान्य जनता आणि ग्रामस्थ यांच्या अत्यंत प्रामाणिक आणि मनोभावे सेवा केली. सातारा जिल्हा रेशनिंग दुकानदार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी रेशनिंग दुकानदारांचे प्रश्न मार्गी लावले. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केल्याची भावना प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी व्यक्त केली. उपस्थित सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दादांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.