जगाच्या विनाशाची सुरुवात? येतोय महाभयंकर त्सुनामी?
5 जुलै 2025 या दिवशी जगाला हादरवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीची शक्यता?


5 जुलै 2025 या दिवशी जगाला हादरवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीची शक्यता?
जगभर सध्या अनेक अशांत घटना घडत असताना, एक नवे भविष्यवाणीजन्य इशारा चर्चेत आहे. आणि हा इशारा दिलाय जपानमधील रियो तात्सुकी, ज्यांना लोक “न्यू बाबा वेंगा” म्हणतात. रियो तात्सुकी यांनी 5 जुलै 2025 रोजी जपानमध्ये येणाऱ्या भीषण त्सुनामीचा इशारा दिला आहे, जी संपूर्ण आशिया खंडाला हादरवू शकते!
तात्सुकी यांचा दावा काय आहे?
जपानच्या दक्षिण भागात – विशेषतः कागोशिमा आणि कुमामोटो परिसरात समुद्राच्या तळाशी खोल भेगा पडतील
त्यामुळे ज्वालामुखीचा उद्रेक होईल
प्रचंड भूकंप आणि त्यातून भीषण त्सुनामी निर्माण होईल
रियो तात्सुकी यांच्या अनेक भविष्यवाण्या यापूर्वी खऱ्या ठरल्या आहेत –
2011 चा तोहोकू भूकंप
COVID-19 चा उद्रेक
राजकुमारी डायनाची मृत्यू
त्यामुळे काय परिणाम झाला आहे?
हाँगकाँग ते जपानदरम्यान फ्लाइट बुकिंगमध्ये 83% घट
जुलै-ऑगस्टमधील सहली रद्द
कागोशिमा, कुमामोटो शहरांत उड्डाणे रद्द
जपानी पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला फटका
तात्सुकी यांचा इशारा फक्त निसर्गापर्यंत मर्यादित नाही –
त्यांच्या मते ही आपत्ती मानवी चूक, आण्विक दुर्घटना किंवा समुद्रातील प्रायोगिक स्फोटामुळेही होऊ शकते.
जपान सरकारचा प्रतिसाद:
मियागी प्रांताचे गव्हर्नर योशिहिरो मुराई यांचे नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन
अफवांमुळे पर्यटन व अर्थव्यवस्थेला फटका होत असल्याची कबुली