दरोडे टाकणारी सराईत दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली गजाआड
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने नेवाशासह राहुरी व पाथर्डी तालुक्यातील वस्त्यांवर दरोडे टाकणाऱ्या तिघा जणांच्या सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली आहे.तीनही आरोपींना नेवासा न्यायालयात हजर केले असता त्यांना 17 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की,नेवासा तालुक्यातील शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांगोणी येथे एका वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश करूनत्यांना व त्यांच्या आईला चॉपर व चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 3 लाख 36 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.याबाबत शिंगणापूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग करत होता.यावेळी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली कि, हा गुन्हा आरोपी रवींद्र भोसले याने व त्याच्या साथीदारांनी केला आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने गंगापूर येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला.आरोपी रवींद्र मुबारक भोसले रा. गंगापूर जि. औरंगाबाद यास ताब्यात घेतले. त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार लखन चव्हाण, कुलथ्या भोसले व इतर साथीदारांनी मिळून केला असल्याची माहिती दिली.त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन आरोपी नंबर उर्फ लखन प्रल्हाद चव्हाण रा. अंतापूर ता. गंगापूर जि. औरंगाबाद व कुलथ्या बंडू भोसले रा. बाबरगाव ता. गंगापूर यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले.आरोपींनी नेवासा व राहुरी तालुक्यात प्रत्येकी दोन तर पाथर्डी तालुक्यात गुन्हे केल्याचे सांगितले. दरम्यान काल तीनही आरोपींना नेवासा न्यायालयात हजर केले असता त्यांना 17 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली