नगर शहरातील नागरिक पितात दूषित पाणी
नगर शहरातील एकूण पाण्याचे नमुने तपासले असता तब्बल 13 टक्के नमुने दूषित निघाले असल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाने दिली आहे ,संदर्भात शहरातील विविध ठिकाणी पाईपलाईन लिकेज शोधून काढण्याचे काम सुरु आहे .नगर शहरातील आगरकर मळ्यामध्ये गेल्या एक आठवड्यापासून जुन्या पाईपलाईनचे लिकेज शोधून ती दुरुस्ती करण्याचे काम सुरु आहे . परंतु हि पाइप लाइन शोधण्यासाठी या संदर्भात प्रशिक्षित माणूस ,इंजिनिअर,लाईनी कशा टाकल्या आहेत, त्याचा नकाशा कोणाकडेच उपलब्ध नाही . संबंधित कर्मचाऱ्यांना पाइप लाईन कुठे आहे या संदर्भात काहीच माहिती उपलब्ध नसल्याने नेमके पाइप लाइन खोदकाम करायचे कुठे, हे कोणालाच माहित नसताना अंधारात गोळीबार केल्यासारखे काम चालू आहे .
मनपाचा जेसीबी आणि ठेकेदाराचे कामगार विनाकारणच आगरकर मळा ऊकरून ठेवत आहेत . या ठिकणी मनपा चा पैशाचा, मशिनरी चा कष्टांचा अपव्यय चालू आहे. गेल्या आठवड्यात नगर शहरातील पाण्याचे नमुने तपासले असता तब्बल 13 टक्के पाण्याचे नमुने दूषित निघाले असल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाने दिली आहे . हे दूषित पानी पिल्याने कॉलरा कावीळ ,गॅस्ट्रो , सर्दी ताप या सारखे आजारहोण्याची शक्यता आरोग्य विभागाने दर्शवली आहे . नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा असे प्रयोग शाळेने महानगर पालिकेला कळवले आहे . या अहवालाची पाणी पुरवठा विभागाने दखल घेतली असून शहरातील विविध भागातील दूषित पाण्याचा पुरवठा होतो ते शोधून काढून पाईपलाईन लिकेज दुरुस्तीचे काम चालू आहे , संदर्भात आगरकर मळ्यामध्ये पाईपलाईन लिकेज शोधून काढण्याचे काम सुरु आहे . परंत्तू या ठिकणी पाइप लाइन संदर्भात माहिती असलेला अधिकारी किंवा कर्मचारी उपलब्ध नसल्याने ठीक ठिकाणी दहा दहा फूट खोल खड्डे खोदल्यामुळे मनपा चा पैशाचा, मशिनरीचा कष्टांचा अपव्यय चालू आहे.