पुणेकरांसाठी मोठी खुशखबर!
पुण्यात येणार आणखी दोन मेट्रो मार्ग, प्रवासाचा अनुभव होणार सुपरफास्ट!

पुण्यात येणार आणखी दोन मेट्रो मार्ग, प्रवासाचा अनुभव होणार सुपरफास्ट!
पुणे शहर झपाट्याने वाढतंय, बदलतंय आणि या बदलात मेट्रो महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला वेग देण्यासाठी एक दिलासादायक निर्णय झाला आहे — वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गाचा आणखी विस्तार होणार आहे आणि केंद्र सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे!
नवीन मेट्रो मार्ग
वनाज ते चांदणी चौक – अंदाजे 1.2 किमी लांबीचा मार्ग
रामवाडी ते वाघोली (किंवा विठ्ठलवाडी) – अंदाजे 11.63 किमी लांबीचा मार्ग
एकूण लांबी: 12.75 किमी
एकूण स्थानकं: 13
महत्त्वाचे थांबे: कोथरूड पीएमटी डेपो, चांदणी चौक, खर्डी बायपास, वाघोली, विठ्ठलवाडी
एकूण खर्च: सुमारे ₹3,756 कोटी (केंद्र व राज्य सरकारचा समान वाटा)
राज्य सरकारने मार्च 2024 मध्ये आपला हिस्सा देण्याला मंजुरी दिली आहे, आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
या प्रकल्पामुळे लाभ
पूर्व-पश्चिम पुणेकरांना मेट्रो कनेक्टिव्हिटी
प्रवासाचा वेळ लक्षणीय कमी
कोथरूड, बावधन, खराडी, वाघोली यांसारख्या भागांना थेट मेट्रो सुविधा

रोज ऑफिस किंवा कॉलेजसाठी जाणाऱ्या नागरिकांना दिलासा
प्रवाशांची संख्या (अंदाज):
2017 – 96,000
2037 – 2 लाख
2057 – 3.5 लाख
कामकाजाची जबाबदारी: महा-मेट्रो
सिव्हिल, इलेक्ट्रो-मेकॅनिकल आणि अन्य कामांचे नियोजन पूर्ण
पूर्णता कालावधी: सुमारे 4 वर्षे
पुणेकरांनो, तुमचा प्रवास होणार स्मार्ट, जलद आणि आरामदायक!