बुधवारी नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन
नगर शहरातील मध्यवर्ती भागामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय होते. सध्या अस्तित्वात असलेल्या बहुतांशी कार्यालय हे मोडकळीस आलेले आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाज करताना मोठी अडचण होत होती. आघाडी सरकारच्या काळात महसूलमंत्री थोरात यांनी या नुतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूमिपुजन केले होते. औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृहाच्या मागे जिल्हाधिकारी कार्यालयाची भव्य इमारत उभी करण्यात आली आहे. या इमारतीचा उद्घाटन सोहळा महसूलमंत्री थोरात यांच्या हस्ते कोरोनाच्या नियमांचे पालन करून करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मंत्री अतुल सत्तार, महापौर रोहिणी शेंडगे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, खा. सदाशिव लोखंडे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, आ. अरुणकाका जगताप, आ. आशुतोष काळे, डॉ. सुधीर तांबे, बबनराव पाचपुते, संग्राम जगताप, मोनिका राजळे, किशोर दराडे, रोहित पवार, किरण लहामटे, निलेश लंके यांच्यासह राज्याचे वरिष्ठ अधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.