अहिल्यानगर महापालिकेत ₹400 कोटींचा रस्ते घोटाळा? संजय राऊत थेट मैदानात!

 776 रस्त्यांची कामं, कोट्यवधींची लूट!

🚨
 अहिल्यानगर महापालिकेत ₹400 कोटींचा रस्ते घोटाळा? संजय राऊत थेट मैदानात!

📍 “ठेकेदार, अधिकारी, प्रशासक आणि राजकीय पाठबळ – महापालिकेतील लूट ठरतेय खुली!”


🔥 776 रस्त्यांची कामं, कोट्यवधींची लूट!

शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी थेट आरोप केला आहे की, अहिल्यानगर महापालिकेतील 776 रस्त्यांच्या कामांमध्ये तब्बल ₹350 ते ₹400 कोटींचा घोटाळा झाला आहे – आणि या सर्व गैरव्यवहाराला राजकीय संरक्षण मिळत आहे!


📩 राऊतांचं थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र!

राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे की:

“महापालिकेतील प्रशासक, अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने महाराष्ट्राच्या तिजोरीची लूट चालू आहे.”


🛣️ घोटाळ्याचे गंभीर परिणाम:

  • रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची!
  • नागरिकांना ना आरोग्य, ना सुविधा!
  • पालिकाच लुटली जात आहे – लोकप्रतिनिधी, ठेकेदार व अधिकाऱ्यांनी मिळून “सिंडिकेट” तयार केलंय!

🔍 राऊतांची मागणी:

या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्यात यावी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत!