🐕‍🔥 #JamkhedLive | मोकाट कुत्र्यांचा हैदोस, जनतेचा संताप! 🛑

जामखेड शहरात मोकाट कुत्र्यांचा व जनावरांचा सुळसुळाट सुरू आहे!

🐕‍🔥 #JamkhedLive | मोकाट कुत्र्यांचा हैदोस, जनतेचा संताप! 🛑

जामखेड शहरात मोकाट कुत्र्यांचा व जनावरांचा सुळसुळाट सुरू आहे!
मुख्य रस्ते असोत की गल्ली – झुंडीच्या झुंडी कुत्र्यांची दहशत!

🚨 मोटरसायकलस्वारांवर पाठलाग,
👶 लहान मुलांना चावे,
👵 वृद्धांना बाहेर पडणंही कठीण,
🚧 रस्त्यावर मोकाट बैल-डुक्करं मधोमध बसतात!

डासांची उत्पत्ती, चिखल, घाण, डेंग्यू-मलेरिया यामुळं आरोग्यावर गदा.

🏍️ सौताडा महामार्गाचं काम संथ,
🚗 रस्ते अर्धवट, वाहतूक कोंडी,
आणि त्यात मोकाट कुत्र्यांची रेलचेल!

बीड रोड, नगर रोड, पोलीस स्टेशन, बाजारपेठ, बसस्थानक परिसरात
रोज १५–२० कुत्र्यांची झुंड फिरते – नागरिक भयभीत!

📣 कुत्र्यांना हाकलले तर अंगावर धावतात,
📍 शेतकऱ्यांच्या शेळ्यांवर हल्ले,
📍 मुलं जखमी, वाहनचालक अपघातग्रस्त.

🗣️ नागरिक म्हणतात –
“जामखेड नगरपरिषद म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा!”
👉 इतक्या तक्रारी असूनही प्रशासन मौनधारण!

मागणी एकच – तात्काळ उपाययोजना करा!
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, शहर स्वच्छ करा, आरोग्य जपा!

📲 ही माहिती शेअर करा –
#JamkhedAlert #StrayDogs #CivicFail #PublicSafety #MetroPortalViral