अर्बन च्या तज्ज्ञ संचालकपदी गुगळे

 नगर अर्बन बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर बँकेत संचालकांच्या नियुक्ती करण्यात आली आहे . चार्टर्ड अकाऊंटंट गौरव गुगळे व कायदेतज्ज्ञ अॅड . राहुल जामदार यांची नियुक्ती बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी करण्यात आली आहे . बँकेचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल व ज्येष्ठ संचालक अनिल कोठारी यांनी त्यांचा सत्कार केला . या वेळी सुवेंद्र गांधी , बँकेचे संचालक दिनेश कटारिया , कमलेश गांधी , केदार लाहोटी आदी उपस्थित होते . गुगळे यांनी याआधीही अर्बन बँकेचे तज्ज्ञ संचालक म्हणून काम केले आहे . अॅड . राहुल जामदार यांनी सिंबायोसिस या आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून कॉर्पोरेट लॉची पदवी घेतलेली आहे .