अवैधरित्या गावमध्ये दारू विक्री होत असल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन..

अवैधरित्या मोठ्या प्रमाणात श्रीगोंदा  तालुक्यातील शेडगाव या गावमध्ये दारू विक्री होत आसून ही दारू विक्री शाळे पासून 500 मीटर च्या आत होत,असल्या मुळे शाळेतील विद्यार्थ्यांना दारूचे धडे अगदी लहान वयात मिळू लागले होते.मोठ्या प्रमाणात दारू विक्री बरोबर मोठ्या प्रमाणात पिनारांची ही संख्या वाढली येवढ्या मोठ्या प्रमाणात दारू विक्री चालू असून ही बीट ला नेमलेल्या पोलीस दादांकडून कुठल्याच प्रकारच्या कारवाई होत नसल्यामुळे दारू विक्री बंद करून वायला जाणाऱ्या पिढी वाचवावी या साठी शेडगाव चे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांना ग्रामसभेत दारू बंदीचा ठराव घेतला व त्याच्या आमलबजावणी साठी श्रीगोंदा पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय व पंचायत समिती यांच्या कडे देण्यात आला या वेळी शेडगाव चे ग्रामविकास अधिकारी प्रशांत देवतरासे, माझी उप सरपंच विजय रसाळ, ग्रा प सदस्य शाहूराज भोपळे, अमोल झेंडे, संतोष रसाळ, तुषार कुदळे, संदीप भुजबळ, सागर बाबर उपस्थित होते.