अहमदनगर जिल्हा भिल्ल असोसिएशनच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन
सावेडी नाका भिल्ल वस्तीच्या ऐवजी सम्राट एकलव्य नगर नाव देण्याची मागणी..
(प्रतिनिधी)- शासन आदेशानुसार महापालिकेने नगर शहरातील 36 जातीय वाचक ठिकाणांची नावे बदलून त्या ठिकाणांना संत महापुरुषांची नावे प्रस्तावित केली आहेत नगर विकास विभागाच्या पुढील आदेशानंतर आता या नवीन नावांच्या संदर्भात अंमलबजावणी केली जाणार असून मनपा ने शहरातील जातीय वाचक ठिकाणांची यादी जाहीर करून त्या ठिकाणांना नवीन नाव सुचवण्याचे सामाजिक संस्था, नागरिकांना आवाहन केले होते. यामध्ये जातीय वाचक ठिकाणांना महापुरुषांचे नावे देण्यासाठी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या यादीत सावेडी नाका येथील भिल्ल वस्तीच्या ऐवजी वडार वस्ती झालेली असून ती दुरुस्ती करून भिल्ल वस्तीच्या ऐवजी सम्राट एकलव्य नगर भिल्लवती सावेडी नाका असे नाव देण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा भिल्ल असोसिएशनच्या वतीने मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना निवेदन देताना अहमदनगर जिल्हा भिल्ल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील ठाकरे, सचिव दैवान फुलपगारे, चंद्रकांत माळी, कैलास गोलवड, विजय गुंजाळ, पोपट गोलवड, सुभाष गोलवड, गोरख बनकर, रवींद्र गोलवड, रूईदास माळी, देविदास गोलवड आदीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हटले आहे की, सावेडी नाका येथील भिल्ल वस्तीच्या ऐवजी मनपाकडून वडार वस्ती सावेडी नाका असे यादीत नाव टाकण्यात आलेले आहे. तरी आम्ही सर्व नागरिक 70 ते 75 वर्षापासून या ठिकाणी राहत आहे. त्यामुळे सावेडी नाका येथील भिल्ल वस्तीला सम्राट एकलव्य नगर भिल्लवती असे नाव द्यावे व 20 जून 2023 पर्यंत नाव बदलण्याची मागणी मान्य झाली नाही तर नागरिक मनपाच्या कार्यालया समोर उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे