अहिल्यानगर जिल्ह्यात गुंतवणूकदार फसवणूक प्रकरण

‘ईडी’चे छापे, दुबईशी कनेक्शन उघड

🚨
अहिल्यानगर जिल्ह्यात गुंतवणूकदार फसवणूक प्रकरण — ‘ईडी’चे छापे, दुबईशी कनेक्शन उघड

अहिल्यानगर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनी प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. सक्तवसुली संचालनालय (ED) ने कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथे अशोक पितांबर अनारसे यांच्या घरी छापा टाकून तब्बल १२ तास चौकशी केली.

👉 मुख्य मुद्दे:
🔹 व्हीआयपीएस ग्रुपच्या नावाखाली गुंतवणुकीच्या आमिषाने कर्जत, जामखेड, अहिल्यानगर आणि राज्यभरातील लोकांकडून कोट्यवधी रुपये जमा केले गेले.
🔹 या रकमेचा बनावट कंपन्या, खात्यांच्या माध्यमातून वापर करून पैसे हवाला मार्गे दुबईला पाठवण्यात आले.
🔹 हवाला व्यवहार लपवण्यासाठी USDT कूटचलनाचा वापर.
🔹 ईडीने आतापर्यंत ₹75.42 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.
🔹 विनोद खुटे यांनी भारत व दुबईत मालमत्ता खरेदी करण्यासाठी 100 कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च केल्याचे तपासात उघड.

🚔 शुक्रवारी सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत ईडीच्या पथकाने अशोक अनारसे यांची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान गोठ्यात दुबईशी संबंधित वस्तूही आढळल्या. या प्रकरणात अशोक अनारसे यांचा संबंध आहे का, यावर तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

❗ कर्जत तालुक्यातील अनेक गोरगरीब गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले असून, नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

 

📌 आरोपी :
विनोद खुटे, संतोष खुटे, मंगेश खुटे, किरण पितांबर अनारसे आणि इतर अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल.