आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयेथे विविध मागण्यांसंदर्भात निवेदन.

आदिवासी फासे पारधी समाजाला भूमिहीन स्वाभिमानी योजना तसेच विविध सरकारी योजनेत समाविष्ट करण्यासाठी  आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले, घोटवी येथील सरपंच अविनाश चव्हाण, राहुल भोसले, मुकेश भोसले, आपला काळे, राजू काळे, गुलाब काळे, बांगर भोसले, महेश काळे, स्वप्नील पवार, चिराजी चव्हाण आदीसह समाज बांधव उपस्थित होते.  आदिवासी फासे पारधी समाज यांना सर्व शासकीय योजने पासून वंचित असून सर्व शासकीय योजनेमध्ये आमचा समावेश करण्यात यावा व स्वाभिमानी सबलीकरण योजना तातडीने राबवण्यात यावे व इतर शासकीय योजना लवकरात लवकर मिळण्यासाठी आदिवासी फासे पारधी संघटनेच्यावतीने विविध मागण्या खलील प्रमाणे की भूमिहीन आदिवासी पारधी कुटुंबांना भूमिहीन स्वाभिमानी सबलीकरण योजना तात्काळ राबविण्यात यावे व गायरान जमीन महाराष्ट्र शासन जमीन अर्ज केलेल्याच्या नावे तात्काळ नोंद करावी तसेच जातीचे दाखले, घरकुल, रेशन कार्ड, आधार कार्ड यांचे कॅम्प घेऊन वाटप करण्यात यावे तसेच महिला बचत गटांना अनुदान देण्यात यावे व संघर्ष आदिवासी युवा फॉर्म प्रोडूसर कंपनी ला अनुदान देण्यात यावे तसेच श्रीगोंदा येथील पारधी वस्तीवर बायपास चौक येथे राहणाऱ्या  पारधी समाजातील लोकांनच्या नावावर जमिनीची नोंद करावी व त्यांना उदरनिर्वाहा चे साधन म्हणून लाईट पाणीपुरवठा नळ योजना घरकुल योजना तातडीने मिळवून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अन्यथा आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीने 1 फेब्रुवारी ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.