उत्कृष्ट सेवा आणि सामाजिक योगदान देऊन वासन व आहुजा परिवाराने वेगळा ठसा उमटविला -पद्मश्री पोपट पवार

पद्मश्री पोपट पवार यांची वासन टोयोटाला भेट

उत्कृष्ट सेवा व सामाजिक योगदान देण्यात वासन व आहुजा परिवाराने वेगळा ठसा उमटविला आहे. वासन टोयोटाच्या माध्यमातून वाहन क्षेत्रात जिल्ह्यात उत्कृष्ट सेवा दिली जात असताना, सामाजिक बांधिलकी ठेऊन त्यांनी लंगर सेवेच्या माध्यमातून कोरोना काळात केलेले कार्य अभिमानास्पद असल्याची भावना पद्मश्री पोपट पवार यांनी व्यक्त केली.
केडगाव एमआयडीसी येथील वासन टोयोटा शोरुमला राज्य आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपट पवार यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शोरुमचे जनक आहुजा, अनिश आहुजा, दीपक जोशी, प्रसन्ना पोपट पवार, किसन सातपुते, दत्तात्रय पादीर, अविनाश अडवोलकर, सचिन कराळे, प्रविण जोशी, रविंद्र थोरात, रविंद्र कुलकर्णी, अमित कंत्रोड, करण चोप्रा, सचिन उदमले, अविनाश लाळगे, कुलदीप भाटियानी आदी उपस्थित होते.
पुढे पद्मश्री पोपट पवार म्हणाले की, जनक आहुजा यांच्या आजोबांना ब्रिटिश काळात मोठ्या जमीनदाराचा दर्जा होता. भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर ते आपले गाव सोडून भारतात अहमदनगर शहरात आले. त्यांनी सेवाभावाने कार्य करुन पुन्हा शुन्यातून विश्‍व निर्माण केले. सामाजिक योगदान देऊन वासन व आहुजा परिवाराने व्यवसायाची भरभराट केली आहे. वासन परिवाराने कोरोना काळात नाशिक मध्ये चालवलेल्या अन्न छत्रामुळे तर नगरमध्ये लंगर सेवेमुळे अनेकांना आधार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. जनक आहुजा यांनी पद्मश्री पवार यांचे स्वागत करुन सत्कार केला. अनिश आहुजा यांनी वासन टोयोटाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल पोळ यांनी केले. आभार प्राची जामगावकर यांनी मानले.