एकवीस वर्ष सामाजिक योगदान देणार्‍या हरदिन मॉर्निंग ग्रुपचा स्नेहमेळावा सामाजिक उपक्रमांनी साजरा

ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र व आरोग्य तपासणी

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून तब्बल एकवीस वर्ष सामाजिक योगदान देऊन वृक्षरोपण व संवर्धनाची मोहिम राबविणार्‍या ग्रुपच्या सदस्यांचा स्नेहमेळावा भिंगार येथील चौंडेश्‍वरी मंदिराच्या सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन सीए रविंद्र कटारिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, नगरसेवक किशोर बोरा, जालिंदर बोरुडे, विद्या जोशी, किशोर भिंगारकर, भारती कटारिया, सविता परदेशी, रमेश वराडे, दिपक बडदे, दिलीप ठोकळ, सुंदर पाटील, दिपक अमृत, दिलीप गुगळे, सर्वेश सपकाळ, दिलीप बोंदर्डे, अभिजीत सपकाळ, भारती कटारिया, सविता परदेशी, प्रांजली सपकाळ, सुनिता वराडे, विद्या जोशी, अ‍ॅड. शितल बेद्रे, संगिता सपकाळ, उषा ठोकळ, सुरेखा आमले, जयश्री बडदे, लक्ष्मी गायकवाड, सरिता अटकर, आरती बोराडे, संध्या हिकरे, राहुल दिवटे, कन्हैय्या बुंदेले, प्रविण परदेशी, सुभाष गोंधळे, नामदेव जावळे, दिपक घोडके, संतोष हजारे, विकास निमसे आदी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
प्रास्ताविकात संजय सपकाळ म्हणाले की, सन 2000 साली हरदिन मॉर्निंग ग्रुपची स्थापना करण्यात आली. मागील 21 वर्षे अविरतपणे ग्रुपचे सामाजिक कार्य सुरू आहे. वृक्षरोपण, संवर्धन व आरोग्याप्रति जागरूक राहून दररोज सकाळी ग्रुपचे सदस्य योग प्राणायाम करतात. महिला दिन, कामगार दिन साजरा करुन विविध सण, उत्सव सामाजिक उपक्रमाने साजरे करण्यात आले आहेत. भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे उन्हाळ्यात झाडांना ग्रुपच्या सदस्यांनी पन्नास हजार रुपये खर्च करून पाणी दिले व वाळत चाललेली झाडे जगवली. आरोग्य, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व रक्तदान शिबीर राबविण्यात आले. माणुसकीची भिंत व कोरोना काळात गरजूंना किराणा वाटप करुन दुर्बल घटकांना आधार देण्याचे काम करण्यात आले. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ततींना एकत्र करुन हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक, पर्यावरण व आरोग्य चळवळ चालवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सीए रविंद्र कटारिया म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपची सामाजिक चळवळ प्रेरणादायी आहे. या ग्रुपचे रूपांतर एका मोठ्या परिवारात झाले आहे. सर्व एकत्र येऊन सामाजिक उपक्रम राबवीत असून, गरजूंना आधारही देत आहे. सर्व एकत्र आल्याने विचारांची देवाण-घेवाण होऊन मोठे सामाजिक कार्य उभे राहिले आहे. संजय सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रुपची उत्तमपणे वाटचाल सुरू असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या स्नेह मेळाव्यात हरदिनच्या सदस्यांना फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून नेत्रदान संकल्प अर्जाचे वितरण करण्यात आले. मरणोत्तर नेत्रदान करणार्‍या सदस्यांनी सदर अर्ज भरुन दिले. यावेळी सिनेसंगीत व करमणुकीचे कार्यक्रम पार पडले. भिंगार छावणी परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत ज्येष्ठ नागरिकांच्या गटात पहिल्या तीन क्रमांकाचे विजेते ठरलेल्या ग्रुपच्या सदस्यांचा गौरव करण्यात आला. वाढदिवस रक्तदान, वृक्षरोपण आदी सामाजिक उपक्रम राबवून साजरे केल्याबद्दल व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या ग्रुपच्या सदस्यांचा सत्कार उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.  हिमोग्लोबीन व रक्ततपासणी बालाजी कार्ले, प्रविण शेळके, देविदास खळदकर यांनी केली. नेत्र तपासणी डॉ. सचिन सोनवणे, डॉ. अमोल पिल्ले, मायाताई आल्हाट यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक अमृत यांनी केले. आभार रमेश वराडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विलास दळवी, शिवाजी बनकर, सुरेंद्रसिंह सोहेल (बिल्ला), संतोष बोबडे, पांडूरंग अटकर, अजय खंडागळे, सुरेश त्रिमुखे, भास्कर भालेराव, आजिनाथ रासकर, सचिन खिस्ती, रमेश कडूस, चेतन वजगडेकर, नंदू आहिरे, रमेश त्रिमुखे, संदिप सोनवणे, बाबासाहेब बेरड, महावीर गांधी, जयकुमार मुनोत, अशोक पराते, सुभाष त्रिमुखे, विकास भिंगारदिवे, मनोहर पाडळे, सरदारसिंह परदेशी, राकेश वाडेकर, हरिश साळुंके, सुभाष नाबरिया, विनोद खोत, रामनाथ गर्जे, तुषार घाडगे,विठ्ठल राहिंज, योगेश करांडे, राजू कांबळे, मुकेश क्षीरसागर, प्रशांत मुथा, निखील नहार, सुयोग चंगेडे, संपत बेरड, पोपट भांड, प्रसाद भिंगारदिवे, मच्छिंद्र बेरड, प्राज्ञक खिरोडे, अशोक लोंढे, धनंजय नामदे, अविनाश जाधव, माधव भांबुरकर, संदीप छजलाणी, आसाराम बनसोडे, भिमराव फुंदे, वैभव खिरोडे, जालिंदर अळकुटे, संजय भावसार, जालिंदर बोंदर्डे, सचिन कस्तुरे, अरुण क्षीरसागर, दिनकर धाडगे, प्रेमपालसिंग, सुधीर बग्गन, सोहम चौधरी, संकेत अटकर, प्रिया बुंदेले, किरण फुलारी आदींनी परिश्रम घेतले.