एटीएम फोडणारी टोळी चोवीस तासांत जेरबंद

नगर : माळी वाड्यातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला कोतवाली पोलिसांनी २४ तासांच्या आत पकडले . सनी सुरजसिंग भोंड ( वय २५ , रा . संजयनगर , काटवन खंडोबा , नगर ) , चिक्या उर्फ रोहित निवृत्ती मेहेत्रे ( वय २५ , रा . माळीवाडा , नगर ) , सोनू सुरजसिंग भोंड ( वय २२ , रा . संजयनगर , काटनव खंडोबा ) अशी आरोपींची नावे आहेत . दि . १३ जानेवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास नियंत्रण कक्षातून माळीवाडा वेस येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळताच कॉन्स्टेबल पुनम नरसाळे यांनी पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांना माहिती दिली . तत्काळ सपोनि विवेक पवार , पोसई महाजन , सतीश भांड , सफी पठाण , योगेश कवाष्टे , मुकुंद दुध कैलास शिरसाठ , याकूब सय्यद , संदीप थोरात , कव्हळे , केकाण , योगेश भिंगारदिवे , संतोष गोमसाळे , दीपक रोहकले , अमोल गाडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आरोपी सनी सुरजसिंग भोंड याला एटीएम मशीनचा खालील भाग हाताने ओढताना रंगेहाथ पकडले . पसार आरोपींचा शोध घेऊन चिक्या उर्फ रोहित निवृत्ती मेहेत्रे , सोनू सुरजसिंग भोड यास ताब्यात घेतले . योगेश कवाष्टे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास गणेश धोत्रे करीत आहेत ….