कर्जत-जामखेड मधील शेतकर्‍यांच्या ऊसाचे टिपरूही राहू देणार नाही – आमदार रोहित पवार

जामखेड —- सध्या संपुर्ण राज्यात ऊसाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे त्यामुळे ऊस तोडला जाईल की नाही असा प्रश्न शेतकर्‍यांच्या समोर उभा आहे याविषयी आमदार रोहित पवारांनी कर्जत-जामखेड मधील शेतकर्‍यांचा संपुर्ण ऊस कारखान्याला नेला जाईल एक टिपरूही शिल्लक राहू देणार नाही असे आश्वासन दिले.आज जामखेड येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते रमेश आजबे, शहाजी राळेभात, महेश राळेभात, अॅड हर्षल डोके, अमोल गिरमे, प्रकाश काळे, राजेंद्र गोरे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अमित शहा यांना साखर कारखान्यातील गैरकारभाराबाबत लिहिलेल्या पत्राविषयी बोलताना आमदार रोहित पवारांनी सांगितले की, मागेही देवेंद्र फडणवीस यांना असेच पत्र दिले होते सीआयडी चौकशी झाली होती यात काहीही निष्पन्न झाले नाही ते त्यांचे काम करतील आम्ही आमचे काम करत राहु आम्ही सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विकासासाठी काम करत आहोत.

जादा ऊसाविषयी बोलताना सांगितले की, सध्या संपूर्ण संपुर्ण राज्यात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे आपला ऊस जाईल कि नाही याविषयी बोलताना आमदार पवार म्हणाले की, कर्जत-जामखेड मधील शेतकर्‍यांचे ऊसाचे एक टिपरूही राहू देणार नाही. ऊस लागवडीनंतर दहा महिन्यात तोड केली असती तर शेतकर्‍याचा तोटा झाला असता म्हणून टोळ्या पाठवलेल्या नाहीत सर्वांचा ऊस नेला जाईल असे आश्वासन दिले