कुकडी सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन व श्रीगोंदा पंचायत सामितीचे माजी उपसभापती अँड डी डी घोरपडे
यांचा अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा शनिवारी होणार
अहमदनगर (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती आदर्श लोकनेते शिक्षणमहर्षी, जेष्ठ विधिज्ञ डी. डी. घोरपडे यांच्या पंचाहत्तरी निमित्त अभिष्टचिंतन सोहळा तसेच त्यांच्या जीवनाकार्य वर प्रकाश टाकणाऱ्या व गणराज प्रकाशन अहमदनगर या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या संपादित चरित्र ग्रंथाचे प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक १० जून रोजी सकाळी १० वाजता सिटी लोन वसंत टेकडी अहमदनगर येथे होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते आणि जेष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री ज्ञानेश योग आश्रम संस्था डोंगरगणचे महंत प. पु. गुरुवर्य ह.भ.प जंगले महाराज शास्त्री हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ सर्जेराव निमसे व सर्व आमदार खासदार राजकीय, सहकार, साहित्य, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यासाठी ऍड डी डी घोरपडे अमृत महोत्सव गौरव समिती तयार करण्यात आली आहे. समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या समितीच्या वतीने ऍड धोंडीराम दौलतराव घोरपडे यांची अमृत साधना हा संपादित चरित्रग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. प्रा गणेश भगत यांच्या गणराज प्रकाशन ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्या ग्रंथाला खा. यशवंतराव गडाख यांची प्रस्तावना आहे. तर डॉ. रेवणनाथ पवार हे संपादक आहेत. या ग्रंथात त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्याविषयी समाजातील विविध क्षेत्रातील धुरिणांनी व्यक्त केलेल्या भाव भावना व विचारांचा, लेखांचा संपादित चरित्र आलेले आहे. मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथून आलेल्या ऍड घोरपडे यांनी कमी वयात श्रीगोंदा तालुका पंचायत समितीचे उपसभापती पदापर्यंत मजल मारली. आणि जेष्ठ काँग्रेस नेते स्व. गोविंदराव आदिक यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अहमदनगर जिल्हा एन एस यु आय चे नेतृत्व त्यानी विद्यार्थीदशेत केले. पुढे श्रीगोंदा तालुक्याच्या विकासाची कामधेनु ठरलेल्या कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या उभारणी करून त्यांनी मोलाचे योगदान दिले. बराच काळ पर्यंत ते या कारखान्याचे व्हॉइस चेअरमन आणि विश्वस्त होते. पुढील कालखंडात ते तत्कालीन श्रीगोंदा तालुक्यातील सर्व पक्षीय नेते मंडळी, माजी मंत्री आबासाहेब निंबाळकर, स्व. खा. बाळासाहेब विखे पाटील, खा. यशवंतराव गडाख व आदी यांचे ते निकटवर्तीय बनले. योग विद्याधाम च्या उभारणीत त्यांचा मोलाचा हात आहे. चिन्मय मिशनच्या माध्यमातून आध्यात्मिक कार्य केले.शिक्षण क्षेत्रात देखील त्यांनी भरीव असे योगदान दिलेले असून त्यांनी स्थापन केलेल्या श्री सिद्धेश्वर बहुद्देशीय विद्या प्रसारक मंडळाचे ते तहहयात अध्यक्ष आहेत. तसेच अहमदनगर येथे श्री मार्कंडे सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून त्याचे ते चेअरमन आहेत अशा विविध क्षेत्रात नेत्रदीपक असं कार्य करणाऱ्या एड. डी.डी. घोरपडे यांचा अमृत महोत्सव सोहळा व अमृत साधना या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे