केडगावात स्थलांतरित कुटुंबायांची आधार नोंदणी

भारतीय डाक विभाग व बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचा संयुक्त उपक्रम स्थलांतरित कुटुंबायांच्या आधार नोंदणीसाठी घेतले शिबीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे स्थलांतरित कुटुंबायांची आधार नोंदणी करण्यात आली. भारतीय डाक विभाग व बॉस्को ग्रामीण विकास केंद्राच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबीराचा अनेक स्थलांतरित कुटुंबीयांनी लाभ घेतला.
केडगाव मधील इंदिरानगर येथे स्थलांतरित कुटुंबीयांना आधार कार्डची नोंदणी करण्याच्या उद्देशाने आधार नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फादर जॉर्ज दिब्रिओ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. शिबीराचे उद्घाटन केडगाव डाक विभागाचे पोस्टमास्तर संतोष यादव यांच्या हस्ते झाले. डाक विभागाच्या वतीने आधार नोंदणीसाठी स्वतंत्र संगणकीयप्रणाली बसवून साहित्य व कर्मचारी यांची विशेष व्यवस्था करून देण्यात आली होती. अहमदनगर प्रधान डाकघरचे बापूसाहेब तांबे व प्रकाश कदम यांनी संगणकीय कामकाज पहिले. यावेळी शाळेचे मुख्ध्यापक, शिक्षक आप्पासाहेब जाधव, अनुजा रिंगणे, अगंणवाडी सेविका रंजना मांढरे, नलिनी पाटोळे, श्याम कांबळे, प्रीतम वराडे, सचिन मोरे, अनिल धनावत यांच्यासह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास आल्हाट यांनी केले. आभार भावना घाटविसावे यांनी मानले.