गांजा डेपो येथील शासकीय कार्यालयासमोर घाणीचे साम्राज्य

शासकीय कार्यालयासमोर नादुरुस्त नळ कनेक्शन, खड्डेच खड्डे आपले स्वागत करीत आहेत..

नगर : संपुर्ण नगर ‌जिल्हाभरातुन‌ आपल्या कामानिमित्ताने गांजा डेपो येथे लोक येतात . या ठिकाणी असलेल्या  शहरातील पुणे बस स्थानक समोरील उप भुमी अभिलेख अधिक्षक कार्यालय,तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक कार्यालय आहे. या समोर नगर पुणे रोड असल्याने या ठिकाणी मोठी वर्दळ असते भुमी अभिलेख कक्षा मुख्य गेट जवळ उड्डाण पूलाच्या खोदकामात  पिण्याच्या पाण्याचे नळ  कनेक्शन तुटलेल्या अवस्थेत असून त्यास चार महिने होत आले आहेत.पण आज पर्यंत अहमदनगर महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांना जाग आलेली नाही. या ठिकाणी हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तसेच या ठिकाणी गाडी पार्किंग,  अतिक्रमण आहेतच. अशा अनेक समस्यांनी हे दोन शासकीय कार्यालये बेजार झाले आहेत. तक्रार कशी आणि कुठे करणार…?

सामाजिक कार्यकर्ते राहुल बटावकर यांनी अनेक वेळा येथील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांना तोंडी तक्रार  देऊन तसेच वारंवार पाठपुरावा करूनही त्याची दखल न घेता फक्त आश्वासन देऊन संबंधितांकडून बोळवण केली जात आहे.

नगर शहराच्या इतर ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई आज जाणवत आहे. अहमदनगर महानगरपालिका अत्यावश्यक सेवेत असलेल्या पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन दुरुस्ती करण्याची तत्परता दाखवत नाही. यावरून महानगरपालिकेच्या कारभाराचा विचार केलेला बरा . या गेट जवळ पिण्याच्या पाण्या बरोबरच मोठा खड्डा  पडलेला दिसत आहे. या ठिकाणी साचलेले  घाणीचे पाणी पुन्हा त्या पिण्याच्या पाईप लाईन मध्ये मागे जाते.तेच  पाणी इतर ठिकाणी जाऊन दुषित पाणी पुरवठा होऊन नगरकर आजारी पडण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे.  मागील वेळी भोसले आखाडा ,माणिक काॅलनी या भागातील ‌नागरीकांना काविळ गेस्ट्रो  अशा ‌विविध साथीच्या आजारांनी संपुर्ण परिसराला घेरले होते. या दुषित पाण्या मुळे‌‌ अनेक नागरिक आजारी पडत आहेत.  जागरूक नागरिकांनी  वेळोवेळी तक्रार मांडुन देखील पुढचा रस्ता दाखवला जात आहे.

अहमदनगर महानगरपालिका‌च्या संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालून या ठिकाणी नळ कनेक्शन दुरुस्ती व पडलेला खड्डा बुजवण्याची मोहिम हाती घ्यावी अशी नगरकरांची अपेक्षा आहे.