गावठी कट्यासह तरुण ताब्यात

श्रीरामपूर – – शहर पोलिसांनी साईबाबा मंदिराजवळ एका तरुणाचा पाठलाग करून त्याला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले . दीपक जाधव ( श्रीरामपूर ) असे आरोपीचे नाव आहे . त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली . पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी पत्रकार परिषदेत कारवाईची माहिती दिली . शहरातील साई मंदिर परिसरामध्ये एक तरुण संशयितरित्या फिरत होता . मात्र , पोलिस पथक तेथे दाखल होताच तरुणाने पळ काढला . पाठलाग करून ‘ त्यास ताब्यात घेतले . कारवाईत मिळून आलेला गावठी कट्टा व काडतूस २० हजार ५०० रुपयांचा आहे . कारवाईत एपीआय जीवन बोरसे , हवालदार राहुल नरवडे , गौतम लगड , रमिरराजा आत्तार , गौरव दुर्गुळे सहभागी झाले होते . आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे .