चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सवाचे आयोजन

समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन

चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने बुधवार दि.16 फेब्रुवारी रोजी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता प्रोफेसर कॉलनी चौकात संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. तर 11 वाजता सावेडी येथील मधुररंजनी सभागृहात (मोरया मंगल कार्यालय शेजारी) अमोल महाराज गांगर्डे यांचे प्रवचन होणार असल्याची माहिती समितीचे संस्थापक-अध्यक्ष शिवाजी साळवे यांनी दिली.
यावेळी चित्रकार सुरेश तेलोरे यांना कला गौरव व निखिल पवार यांना शिक्षण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने होणार असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.